पांगिरेजवळ चिकोत्रा पुलावरून बस वाहून गेली ; ११ प्रवाशी बचावले, चालकास अटक

नदीचे पुलावर मोठ्याप्रमाणात पाणी आहे, बस पुढे नेऊ नका असे सांगत असताना त्याने काहीही न ऐकता बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
पांगिरेजवळ चिकोत्रा पुलावरून बस वाहून गेली ; ११ प्रवाशी बचावले, चालकास अटक
The bus was swept away on Chikotra bridge, 11 passengers were released and the driver was arrested

गारगोटी : गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील पांगिरे गावाजवळ चिकोत्रा पूलावरील पूराच्या पाण्यातून खासगी प्रवासी बस वाहून गेली. तर पोलिस पाटील व छत्रपती प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी प्रसंगावधान दाखविल्याने ११ प्रवाशी सुखरूप बचावले. या प्रकरणी भुदरगड पोलिसांनी चालकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. The bus was swept away on Chikotra bridge, 11 passengers were released and the driver was arrested

आज पहाटे साडे तीन वाजता चालक अजित जयवंतसिंह रजपूत (रा. नाशिक) हा सावतामाळी कंपनीची मोठी प्रवासी बस क्रमांक (जीजे १४ - झेड २३७०) ही प्रवासी घेऊन गडहिंग्लजकडून गारगोटीमार्गे नाशिककडे जात होता. यावेळी पोलिस पाटील संदीप आनंदा गुरव व सहकाऱ्यांनी त्याला नदीचे पुलावर मोठ्याप्रमाणात पाणी आहे, बस पुढे नेऊ नका असे सांगत असताना त्याने काहीही न ऐकता बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 

बसमधील प्रवाशांनी जीवितास धोका आहे बस पुढे नेऊ नका असे सांगूनही हयगयीने, हलगर्जीपणाने चिकोत्रा नदीच्या जोराने वाहणाऱ्या प्रवाहात बस घालून स्वतःसह बसमधील प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करून सर्वांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी फिर्याद पोलिस पाटील संदीप गुरव यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चालक अजित परदेशी याला अटक केली आहे.

यांच्यामुळे वाचला जीव....

पांगिरेचे पोलिसपाटील संदीप गुरव, छत्रपती प्रतिष्ठानचे स्वयंसेवक निलेश भराडे, नितीन भराडे, अक्षय भराडे, संतोष भराडे, अमोल चव्हाण, भैरवनाथ चव्हाण यांनी बस नदी पात्रात वाहून जात असताना प्रसंगावधान दाखवित प्रवाशांना बाहेर काढल्याने त्यांचे जीव वाचविले. या सर्व प्रवाशांची पांगिरेत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in