प्रताप ढाकणेंना शह देण्यासाठी आमदार राजळेंना पंकजा मुंडे ताकद देणार

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना यश आले.`मी नाराज नसून, पक्ष हाच सर्वश्रेष्ठ`, असे सांगत कामाला लागण्याचे आदेश दिले. काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पंकजा मुंडे नाराज नसल्याचे सांगून कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला.
प्रताप ढाकणेंना शह देण्यासाठी आमदार राजळेंना पंकजा मुंडे ताकद देणार
Rajale and dhakne.jpg

नगर : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या पाथर्डीतील कार्यकर्त्यांची नाराजी काढण्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना यश आले. `मी नाराज नसून, पक्ष हाच सर्वश्रेष्ठ`, असे सांगत कामाला लागण्याचे आदेश दिले. काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पंकजा मुंडे नाराज नसल्याचे सांगून कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाथर्डी-शेवगावमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांना आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांना मुंडे ताकद देणार, असे संकेत राजकीय वर्तुळातून आहेत.

पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या आमदार आहेत. भाजपमध्ये दोन गट सक्रिय आहेत. त्यातील काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच पदाधिकाऱ्यांच्या काही निवडी जाहीर करून भाजपने राजळे यांच्या विरुद्धची लढाई सुरू केली आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत राजळे यांना मुंडे यांनी ताकद दिली. विधानसभेची जागा खेचून आणली. या वर्षी मात्र पंकजा मुंडे याच पक्षात नाराज असल्याचे मानले जाते. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या तसे सांगून टाकले होते, मात्र नंतर राज्यभरातून कार्यकर्ते मुंडे यांना भेटण्यास गेले. एव्हढेच नव्हे, तर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे पाठविले होते. मुंडे यांनी हे सर्व राजीनामे नामंजूर करीत पक्षाचे काम जोमाने करण्याचा सल्ला दिला.

मुंडे यांच्या भूमिकेवरच भिस्त

पाथर्डी-शेवगावमध्ये भाजपची भीस्त मुंडे यांच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. तेव्हा आमदार राजळे त्यांना भेटण्यासाठी गेल्या. `मी आमदारकीचा राजीनामा देते, तुम्ही पाथर्डी-शेवगावमधून निवडून या,` असे सांगत त्यांनी मुंडे यांच्यावरील प्रेम दाखवून दिले. आता राजळे यांच्यापुढे अॅड. ढाकणे यांचे आव्हान आहे. ते परतविण्यासाठी मुंडे यांची साथ राजळे यांना आवश्यक आहे. मुंडे जरी पक्षावर नाराज असल्या, तरी राजळे यांच्यासाठी तरी त्यांना ताकद उभी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंडे यांच्या भूमिकेवरच पाथर्डी-शेवगावमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील पक्ष अशी लढत आगामी ग्रामपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकीतून दिसून येणार आहे.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in