गोपीनाथ मुंडे, भुजबळ असो की मी; ओबीसी नेत्यांचा भाजपकडून छळ : एकनाथराव खडसे - BJP persecutes many OBC leaders : Eknathrao Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

गोपीनाथ मुंडे, भुजबळ असो की मी; ओबीसी नेत्यांचा भाजपकडून छळ : एकनाथराव खडसे

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 मे 2021

चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळांना धमकी दिल्यामुळे आता नाथाभाऊ, भुजबळ यांच्यामागे ईडी लावणारे दुसरे कोणी नाही तर भाजपचेच होते, हे त्यावरुन स्पष्ट झालय असल्याचा आरोपही खडसेंनी कुणाचेही नाव न घेता केला. छगळ भुजबळ अशा धमक्यांना घाबरणारे नसल्याचेही ते म्हणाले.

जळगाव : भाजप (BJP) पक्षाकडून ओबीसी (OBC) नेत्यांना टारगेट करणे, छळ करणे ही आजची बाब नाही. मीच काय पण अगदी गोपीनाथ मुंडे (Gopinath Mundhe) यांच्याइतका छळ कुणाचाही झाला नाही. पक्षाची साथ दिली नाही. विरोधात बोलले की लगेच मागे ईडी, सीबीआय (CBI) लावून छळ केला जातो. पक्ष सोडल्यानंतर मी असो की छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) आमच्या मागे पक्षानेच ईडी लावण्याचे हे षडयंत्र केल्याचे सिध्द झाले असा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. (BJP persecutes many OBC leaders: Eknathrao Khadse)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून तुम्ही जामीनावर सुटले आहात, असे म्हणत धमकी दिली. यावर आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते खडसे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. खडसे म्हणाले, भाजपने सुरुवातीपासूनच ओबीसी नेत्यांना न्याय दिलेला नाही. भाजपमधील सर्वच नाही मात्र, काही नेत्यांकडून नेहमीच ओबीसी नेत्यांना टारगेट करण्याची भूमिका राहिली आहे. माझ स्वतःच उदाहरण असल्याचेही खडसे म्हणाले.  

हेही वाचा : पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकावर आदित्य ठाकरे म्हणतात... हे तर व्हिटॅमिन!

वेगवेगळे आरोप करायचे, ओबीसी नेत्यांना बदनाम करायचे हे माझ्याबाबत असेल, बावनकुळे, भाऊसाहेब फुंडकर असे किती तरी नेते आहेत, त्यांचा छळ झाला आहे. मात्र पक्ष म्हणून अनेकांनी तो सहन केला. चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळांना धमकी दिल्यामुळे आता नाथाभाऊ, भुजबळ यांच्यामागे ईडी लावणारे दुसरे कोणी नाही तर भाजपचेच होते, हे त्यावरुन स्पष्ट झालय असल्याचा आरोपही खडसेंनी कुणाचेही नाव न घेता केला. छगळ भुजबळ अशा धमक्यांना घाबरणारे नसल्याचेही ते म्हणाले.

आवश्य वाचा : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर भाजप नेते तब्बल दीड वर्षानंतर खळखळून हसले.....

हेही वाचा : फडणवीसांनी मराठा समाजाची फसवणूक केली..

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख