महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या बदनामी प्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीवर गुन्हा दाखल

पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे मोतीलाल नेहरु यांचे वैध अपत्य नाही, असा व्हिडिओ तिने ऑक्टोंबर २०१९ मध्ये फेसबुकवर टाकला होता.
Actress Payal Rohatgi charged in defamation case of Mahatma Gandhi and Pandit Nehru
Actress Payal Rohatgi charged in defamation case of Mahatma Gandhi and Pandit Nehru

पुणे : महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि गांधी परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Actress Payal Rohatgi charged in defamation case of Mahatma Gandhi and Pandit Nehru

राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परीवार यांच्याविषयी बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो पायल हिने सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यातून हिंदु -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. याबाबतचा व्हिडीओ तिवारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्हॉट्सऍपवर पाठवला होता. त्यानंतर याबाबत दखल घेत संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. 

सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे. पायल रोहतगी नेहमीच वादग्रस्त पोस्ट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. पायल हिने दिग्दर्शक दिबाकर बनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. यापूर्वी ट्विटरने खोट्या व बदनामीकारक पोस्ट टाकल्याने पायल हिचे अकाऊंट अनेक वेळा बंद केले आहे. हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरणात सांप्रदायिक ट्विट केल्याने तिच्यावर एक आठवड्याची बंदी घालण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलने रोहतगी ला २०१९ मध्ये ब्लॉक देखील केले होते. 

जून २०१९ मध्ये पायल रोहतगी हिने शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक टिप्पणी केली होती. त्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार करुन तिच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर तिने माफी मागणारा व्हिडिओ प्रसारित केला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे मोतीलाल नेहरु यांचे वैध अपत्य नाही, असा व्हिडिओ तिने ऑक्टोंबर २०१९ मध्ये फेसबुकवर टाकला होता. त्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर तिने प्रियंका गांधी व सोनिया गांधी यांची जाहीर माफी मागितली होती. 

त्यानंतर पुन्हा १५ डिसेंबर रोजी तिने नेहरु गांधी परिवारावर टिप्पणी केली होती. यावरुन अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली होती. न्यायालयाने तिला दुसर्‍या दिवशी जामिनावर सोडले होते. त्यानंतर जुलै २०२०मध्ये ट्विटरने तिचे अकाऊंट पुन्हा एकदा निलंबित केले होते. त्यानंतर आता पायल रोहतगी विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्याने काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com