परिवहन मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा 

राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातील चालक कमलाकर बेडसे यांनी केलेली ही आत्महत्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाली आहे. अशातच या कुटुंबीयांना आधार देण्याऐवजी पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून पाप केले.
Chitra Wagh
Chitra Wagh

साक्री : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातील चालक कमलाकर बेडसे (ST Driver Kamalakar Bedse suicide) यांनी केलेली ही आत्महत्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे (This is due to  inactive Government) झाली आहे. अशातच या कुटुंबीयांना आधार देण्याऐवजी पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून पाप केले (instead of support there family Police register a case) असून या कुटुंबाची जबाबदारी घेऊन परिवहन मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, (FIR shall ragister against Transport Minister) अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. 

येथील एसटी आगारातील चालक कमलाकर बेडसे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी चित्रा वाघ मंगळवारी (ता.३१) साक्री येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मयत बेडसे यांच्या पत्नी व मुलांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यात निरीक्षक दिनेश आहेर यांची भेट घेत चर्चा केली. विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी शासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवत टीकास्त्र सोडले. तसेच आत्तापर्यंत एस.टी महामंडळातील तीन कर्मचाऱ्यांनी या प्रकारे आपली जीवनयात्रा संपवली असून शासनाने त्वरित पावले उचलून या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्रीमती वाघ त्यांनी यावेळी केली. 

भेटी वेळी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा.सविता पगारे, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, साक्री मंडळ अध्यक्ष वेडु सोनवणे, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते, विजय ठाकरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे, सुधीर अकलाडे, उत्पल नांद्रे, सरचिटणीस प्रदीप नांद्रे, धनंजय अहिरराव, दिनेश सोनवणे, राकेश दहिते, योगेश भामरे, संजय अहिरराव, रमेश सरक, शहराध्यक्ष कल्याण भोसले, महेंद्र देसले, दीपक वाघ, धनराज चौधरी, प्रा.विजय देसले, ॲड.सुरेश शेवाळे, दिनेश नवरे, दीपक कोठावदे, अंकित बच्छाव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 
--- 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com