मीरा भाईंदरमधील बॅनरवरून मनसे आक्रमक; कारवाईसाठी पालिका, पोलिस आयुक्तांना साकडे 

उत्तर भारतीय आमदार होणार असल्याचे बॅनर लागल्याने येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अजून शिवसेनेने मात्र आपली प्रतिक्रिया दिली नसल्याने शिवसेना गप्प का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
MANSE aggressive from banner in Mira Bhayander
MANSE aggressive from banner in Mira Bhayander

विरार : एका बाजूला कोरोनाचे सावट तर दुसऱ्या बाजूला कोणत्या ना कोणत्या कारणाने शहरात वाढत असलेला तणाव. यात काळ रात्री मीरा भाईंदरभर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे या तणावात भर घातल्याचे बोलले जात आहे. शहरात अनधिकृतपणे लावलेल्या बॅनरवर आणि ते बॅनर लावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. अन्यथा, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी दिल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. MANSE aggressive from banner in Mira Bhayander
 
संपूर्ण मिरा-भाईंदर शहरात "इसबार मीरा भाईंदर का आमदार उत्तर भारतीय होगा" असे बॅनर लावल्याने समाजात तेढ निर्माण होईल. समाजात अशांतता पसरवणाऱ्या आणि वाद निर्माण होणाऱ्या आक्षेपार्ह मजकूराचे बॅनर बनवणाऱ्या व लावणाऱ्या समाजघटकांना अटक करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच हे बॅनर तत्काळ हटविण्यात यावेत, अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष हेमंतभाऊ सावंत यांनी पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त , स्थानिक पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

 येत्या दोन दिवसात कारवाई झाली नाही तर, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याने येथील वातावरण चांगलेच तापले आहे. मीरा भाईंदरमध्ये यापूर्वी स्थानिक आगरी कोळी यांना डावलून उत्तर भारतीय भवन बांधण्यावरून वातावरण चांगलेच तापले असतानाच आता हे उत्तर भारतीय आमदार होणार असल्याचे बॅनर लागल्याने येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अजून शिवसेनेने मात्र आपली प्रतिक्रिया दिली नसल्याने शिवसेना गप्प का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com