गडकरींना पंतप्रधान करा, असे भाजपचीच मंडळी म्हणत आहेत... : काॅंग्रेस नेत्याचा दावा

मोदी सरकारमध्ये बदलाची शक्यता...
modi-patole-gadkari
modi-patole-gadkari

मुंबई : आता लोकसभेची निवडणूक झाली तर मोदींना 400 जागा मिळतील, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याची काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली असून मोंदीना राजीनामा द्यायला सांगून खरेच निवडणुका घ्यायला सांगाव्यात, असा टोला लगावला आहे. (Nana Patole says we are ready to fight lok sabha election)

पत्रकारांशी मुंबईत बोलताना पटोले म्हणाले की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत. हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे, अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला आहे.

नितीन गडकरी यांनी कोरोना काळात चांगले काम केल्याचा दाखला देत कोणी त्यांच्याकडे आरोग्य खात्याची सूत्रे द्यावेत अशी मागणी करत आहे. ती आता मागे पडून काही मंडळी त्यांना पंतप्रधान करा, असेही सुचवत आहेत. अर्थात कोणत्याही वरिष्ठ भाजप नेत्याने तशी अधिकृत मागणी केलेली नाही. 

केंद्रीय मंत्रीमंडळात नरेंद्र मोदी फेरबदल करणार असल्याची चर्चा आहे. त्यात काही मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, असेही सांगितले जात आहे. कोरोना काळात मोदी सरकारविषयी नाराजी असल्याची पक्षनेतृत्वाला जाणीव झाल्याने त्यावर राजकीय उपाययोजना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com