क्लिष्ट बंधनांतून अमित शहा सहकार क्षेत्राला सोडवतील : जयंत पाटील

गुजरात व महाराष्ट्रात सहकार आहे. गुजरातचा सहकार आहे, जो अमित शहा एक बँक चालवत होते, अशी माझी माहिती आहे.
Jayant Patil - Amit Shaha
Jayant Patil - Amit Shaha

मुंबई : महाराष्ट्र आणि गुजरातमधील सहकार क्षेत्र सारखेच आहे. आतापर्यंत नागरी अर्बन बॅंकांवर नाबार्डचं बंधन होते, ते सर्वमान्यही होते. पण नंतर नंतर केंद्र सरकारने कायद्यांमध्ये बदल करून या क्षेत्राला अडचणीत आणले. माझ्या मते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Central Home Minister Amit Shaha यांना सहकाराचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे ते क्लिष्ट कायद्याच्या बंधनांतून सहकार क्षेत्राला बाहेर काढतील, amit shaha will free the cooperativ sector from complicated constraints  असा विश्‍वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी व्यक्त केला. 

जयंत पाटील म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर नव्याने बंधने आणली आहेत. नाबार्डचं बंधन होतं ते सगळ्यांना मान्य होतं. परंतु जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या करून केंद्र सरकारने त्यांच्यावर अंकुश निर्माण केला आहे. त्यामुळे या जाचातून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला सोडवतील, असा विश्वास व्यक्त करतानाच अमित शहा यांच्या नेमणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे. 

दरम्यान या देशातील सर्व बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय. त्यासाठी पवारसाहेब एक-दोन दिवसांत महाराष्ट्रातील आणि देशातील बँकिंग सेक्टरला व सहकार सेक्टरला कसं संकटात आणलेलं आहे, हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. गुजरात व महाराष्ट्रात सहकार आहे. गुजरातचा सहकार आहे, जो अमित शहा एक बँक चालवत होते, अशी माझी माहिती आहे. नोटबंदीच्या काळात जास्त नोटा एक्स्चेंज करण्यात आल्या. त्यामुळे त्यांच्या बँकेचे नाव सर्वात पुढे आले होते. त्यामुळे अमित शहा यांना सहकाराचा जास्त अनुभव आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यांच्यात फारसा फरक नाही. अमित शहा यांच्या नेमणुकीमुळे सहकार चळवळ वाढायला मदत होईल, असेही जयंत पाटील म्हणाले. आज रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर बंधने घातली आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधने घालतेय. त्यांची स्वायत्तता धोक्यात आणलेली आहे. या सगळ्यातून अमित शहा या सेक्टरला सोडवतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com