धक्कादायक : पोलिस महिलेने घडवली सहकाऱ्याची हत्या 

पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी पनवेल शहर पोलिसांची कौतुक करून त्यांना बक्षिस देणार असल्याचे जाहीर केले आहे.
0crime1_final.jpg
0crime1_final.jpg

नवी मुंबई :  कारची धडक देऊन हत्या करून वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न एका महिला पोलिसाने केला. पनवेल पोलिसांनी या हत्येचा तपास लावून त्या महिला पोलिसाला तिच्या दोन सहकाऱ्यांसह अटक केली आहे.  गुन्हा उघडकीस आणल्याने पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी पनवेल शहर पोलिसांची कौतुक करून त्यांना बक्षिस देणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबईतील नेहरूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शीतल प्रकाश पानसरे या महिला पोलिसाने त्याच पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक शिवाजी सानप (वय ४९) यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात महिलेसह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारची स्थिती गांधीजींच्या तीन माकडासारखी 
आरोपींनी मागील वर्षभरापासून कट रचून नॅनो कारची धडक देऊन ही हत्या करून सानप यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी शीतल पानसरे (वय २९), विशाल बबनराव जाधव (वय १८) व गणेश लक्ष्मण चव्हाण ऊर्फ मुदावथ (वय२१) या तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली.
शिवाजी सानप १५ ऑगस्ट रोजी पनवेल येथे कारची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सानप यांची पत्नी व मेव्हणा यांनी अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी कौशल्याने तपास करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला. गणेश लक्ष्मण चव्हाण ऊर्फ मुदावथ याला तेलंगणा येथून ताब्यात घेतले, तर शीतल व विशाल या दोघांना उलवे येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी सांगितले.

अनैतिक संबंधांतून कट
शिवाजी सानप व शीतल पानसरे त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. काही कारणामुळे त्यांच्यात वाद होऊन त्यांचे संबंध तुटले. त्यातून शीतल हिने घरकाम करणारा विशाल जाधव व त्याचा मित्र गणेश चव्हाण यांना सोबत घेऊन सानप यांना ठार मारण्याचा कट रचून तडीस नेला. शीतलने सानपवर विनयभंगाचा व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्यपूर्वक तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी पनवेल शहर पोलिसांची कौतुक करून त्यांना बक्षिस देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com