मनसे नाशिक जिल्ह्यातील सर्व पंधरा जागांवर उमेदवार देणार

''मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊन नाशिकची फसवणूक केली आहे. त्याविषयी प्रत्येकाला चीड वाटली पाहिजे. त्यासाठी येत्या निवडणूकीत भाजपचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सर्व पंधरा मतदारसंघात आपला उमेदवार देणार,'' अशी घोषणा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज येथे केली.
MNS Chief Raj Thakarey
MNS Chief Raj Thakarey

नाशिक : ''मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊन नाशिकची फसवणूक केली आहे. त्याविषयी प्रत्येकाला चीड वाटली पाहिजे. त्यासाठी येत्या निवडणूकीत भाजपचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सर्व पंधरा मतदारसंघात आपला उमेदवार देणार,'' अशी घोषणा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज येथे केली. 

येथील पक्षाचे कार्यालय राजगड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा झाली. यामध्ये सर्वच कार्यकर्ते निवडणुकीत उमेदवार देण्याविषयी आग्रही होते. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, "पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात उमेदवार देण्याचे आदेश दिले आहे. या निवडणुकीत कार्यकर्ते मनापासून व जिद्दीने उतरले नाहीत तर पुन्हा आपल्याला दोष दिले जातील. त्यामुळे प्रत्येकाने आजपासून रोज किमान पन्नास घरांमध्ये जाऊन संपर्क सुरु करावा. रोज हा संपर्क वाढवत न्यावा. त्यात भाजप व मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे शहर दत्तक घेऊन काहीही कामे केली नाहीत. उलट समस्या वाढवुन ठेवल्या आहेत. शहराचे प्रश्न तीव्र आहेत. एव्हढा खोटारडा प्रचार करणारा पक्ष आपण पाहात आहोत. त्याची चीड नागरीकांनी येऊ द्या,'' 

यावेळी इच्छुक उमेदवारांची नावे घेण्यात आली. त्यांची नोंदणी सुरु आहे. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी आमदार नितीन भोसले,  जिल्हा अध्यक्ष अनंत सुर्यवंशी, अॅड रतनकुमार इचम, माजी सभागृह नेते सलीम शेख, शहराध्यक्ष अनिल मटाले, सुजाता डेरे, शाम गोहाड आदी उपस्थित होते.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com