महाराष्ट्रात  २१ आॅक्टोबर रोजी मतदान; २४ आॅक्टोबरला मतमोजणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी केली. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यात २१ आॅक्टोबरला निवडणुकीचे मतदान होईल. निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात येतील. हरयाणातही याच दिवशी मतदान होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबरला काढण्यात येईल.
Maharashtra Assembly Dates Declared
Maharashtra Assembly Dates Declared

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी केली. महाराष्ट्रात  २८८ जागांसाठी   मतदान होणार आहे. राज्यात २१ आॅक्टोबरला निवडणुकीचे मतदान होईल. निवडणुकीचे निकाल  २४ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात येतील. हरयाणातही याच दिवशी मतदान होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबरला काढण्यात येईल.

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची प्रतिक्षा संपली असून आजपासून निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंग येणार आहे. आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह हरयाणाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला तर हरयाणा विधानसभेची मुदत २ नोव्हेंबरला संपते आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी ८ कोटी ९४ लाख मतदार आहेत. उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये असून महाराष्ट्रसाठी दोन विशेष खर्च निरिक्षक पाठविण्यात येणार आहेत. 

महाराष्ट्रातील निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे- 
निवडणूक अधिसूचना - २७ सप्टेंबर
निवडणूक अर्ज दाखल करणे - ४ आॅक्टोबर पर्यंत
अर्जांची छाननी - ५ आॅक्टोबर
निवडणूक अर्ज माघारी - ७ आॅक्टोबर पर्यंत
मतदान - २१ आॅक्टोबर
मतमोजणी - २४ आॅक्टोबर
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com