MLA`s resignation not an answer : Ajit Pawar | Sarkarnama

आमदारांच्या राजीनाम्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही : अजित पवार

मिलिंद संगई
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

बारामती शहर :  आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे प्रश्न सुटतील, असे वाटत नाही, त्यामुळे ज्या वेळेस मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन होईल. तेव्हा सभागृहात उपस्थित राहून त्या बाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही आमदार असणे गरजेचे आहे, अशी भूमिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.

मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग या घऱासमोर मराठा समाजाने आंदोलन केले. या आंदोलनात अजित पवार सहभागी झाले. तसेच त्यांनी घोषणाही दिल्या. 
 
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काही आमदारांनी राजीनामे दिले. मात्र काही महिन्यांत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल. त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन  बोलावले गेले तर त्या वेळे सभागृहात लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे, त्यामुळे राजीनामा हा काही आरक्षण मिळविण्यावर मार्ग आहे असे मला वाटत नाही. 

आमदारांनी राजीनामे देऊन आज राज्यातील सर्व प्रश्न सुटणार असतील, तर त्याही बद्दलचा विचार करता येऊ शकतो, पण खरच सर्व प्रश्न सुटणार आहेत का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांचा फडणवीस सरकारवर विश्वास उरलेला नसून त्यांची विश्वासार्हताच संपलेली आहे, सरकारच्या शब्दावर विश्वास राहिलेला नसल्याने सगळेच घटक सरकारकडून लेखी आश्वासन मागत आहेत, असेही ते म्हणाले. 

शरद पवारांच्या घरसमोर अजित पवारांची घोषणा...`एक मराठा...लाख मराठा!` #MaharshtraBandh

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख