ajit pawar participates in maratha agitation | Sarkarnama

शरद पवारांच्या घरसमोर अजित पवारांची घोषणा...`एक मराठा...लाख मराठा!` #MaharshtraBandh

मिलिंद संगई
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मराठा आंदोलनाचा राज्यभर धडाका सुरू असून अनेक बडे नेतेही त्यात सहभागी झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आजच्या बंदमध्ये सहभागी होत त्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. शरद पवारांच्या घरासमोर त्यांचे पुतणे अजित पवारांचे आंदोलन हा तसा एक नोंद घ्यावा असाच क्षण ठरला.  

बारामती : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील `गोविंदबाग`या बंगल्यासमोर मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी आज ठिय्या धरला. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. अजित पवारांनीही एक मराठा...लाख मराठा, अशा घोषणा देत आंदोलकांना जोरदार पाठिंबा दिला.

बारामतीत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन गेले काही दिवस सुरू होते. शरद पवार यांच्याही घरासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी साडेनऊ वाजता आंदोलक गोविंदबागेसमोर जमले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास अजित पवार हे तेथे पोचले. त्यांना रस्त्यावर खाली बसत आंदोलनात सहभागी झाले.

त्यांनंतर त्यांनी हातात माईक घेतला. मराठा आंदोलकांच्या घोषणाही त्यांनी दिल्या. एक मराठा..लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं...नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी नारेबाजी त्यांनी केली. आंदोलकांनी दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख