रोहित पवार म्हणाले.....कुस्ती की क्रिकेट? मुलाला विचारून सांगतो 

मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात आमदार रोहित पवार यांच्या हस्ते यशस्वी पैलवानांचा सत्कार करण्यात आला. पंकज हारपुडे, अनिल पवार, विलास कथुरे, शिवाजी तांगडे,राहूल शेडगे,स्वस्तिक चोंधे,तुषार माझिरे,धनराज करंजावणे, गणेश मारणे ,युवराज जाधव उपस्थित होते
MLA Rohit Pawar Felicitated Wrestlers
MLA Rohit Pawar Felicitated Wrestlers

पुणे : तुमच्या मुलाला कुस्तीत आणणार की क्रिकेट शिकवणार हा एका पैलवानाने टाकलेला गुगली आमदार रोहित पवारांनी 'हे मुलाला विचारून सांगतो,' असे सांगत परतावून लावला. 

मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात आमदार रोहित पवार यांच्या हस्ते यशस्वी पैलवानांचा सत्कार करण्यात आला. पंकज हारपुडे, अनिल पवार, विलास कथुरे, शिवाजी तांगडे,राहूल शेडगे,स्वस्तिक चोंधे,तुषार माझिरे,धनराज करंजावणे, गणेश मारणे ,युवराज जाधव उपस्थित होते. यावेळी एका पैलवानाने त्यांना,'तुमच्या मुलाला तुम्ही कुस्तीत आणणार की क्रिकेटमध्ये?" असा प्रश्न विचारला. यावर रोहित पवार यांनी 'हे त्यालाच विचारतो आणि सांगतो.'असे उत्तर दिले.

यावेळी पवार म्हणाले,"मला क्रिकेटची आवड आहे. कुस्तीची फारशी माहिती नव्हती आता कुस्ती समजून घेतोय. मला कुस्ती बघायला आवडते,'' यावेळी आमदार पवार यांनी उपस्थित पैलवानाकडून कुस्तीचे डाव समजून घेतले.''मला कुस्ती खेळता येत नाही पण मला क्रिकेट चांगले खेळता येते.मी सुद्धा तुमच्यासारखा एक खेळाडू आहे.त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रश्नांसाठी मी आपल्या सोबत उभा राहीन."असे आमदार पवार म्हणाले.

यावेळी उपस्थित मल्लांशी बोलताना त्यांनी,"एका कार्यक्रमात मी आणि राजकीय प्रतिस्पर्धी राम शिंदे एकत्र आलो होतो. तेव्हा निवेदकाने माझ्याबद्दल बोलताना भावी आमदार असा उल्लेख केला तेव्हा आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसलो."हा किस्सा सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com