maharshatra influential leader jitendr avha in sarkarnama diwali ank interview | Sarkarnama

गोपीनाथ मुंडेंना बायकोने सांगितले," ते एकवेळ मला सोडतील पण पवारसाहेबांना नाही!'' : जितेंद्र आव्हाड 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

2001 मध्ये गोपिनाथ मुंडेसाहेबांचा एकेदिवशी मला फोन आला होता.ते म्हणाले होते, की मी आणि प्रमोद महाजन यांनी ठरविले आहे की तुला विधान परिषदेवर पाठवायचे आहे. तू तुझ्या बायकोशी चर्चा कर. खरेतर मी बायकोशी चर्चा केलीच नाही पण तिला सांगितले, की मी मेलो तरी पवारसाहेबांना सोडणार नाही. शेवटी माझ्या बायकोने मुंडेसाहेबांना फोन केला आणि सांगितले, की एकवेळ तो मला सोडेल पण, पवारसाहेबांना सोडणार नाही. सरकारनामा फेसबुक लाइव्हमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड 

प्रश्न : इतर किंवा विरोधीपक्षातील असा कोणता नेता आहे की त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो ? 

आव्हाड : एक नाव खूप आदराने आणि प्रेमाने घेईन ते म्हणजे स्व. गोपिनाथराव मुंडेसाहेब. एकवेळ अशी आली होती की मी अडचणीत सापडलो होतो. शरद पवारसाहेब माझे नेते आहेतच. मी साहेबांना सोडून कधी गेलो नाही. माझ जे "एनसीपी'तील रडगाण आहे ते शब्दातून किंवा पत्रातून त्यांच्यासमोर मांडत असतो. तर माझ्या सासऱ्याची आणि मुंडेसाहेबांची ओळख होती. माझी अडचण त्यांनी मुंडेसाहेबांनी सांगितली होती. ते त्यांना म्हणाले, की मूर्ख आहे का तो? तो माझ्या मुलासारखा आहे. त्यांनी दुसऱ्यादिवशी मला भेटायला बोलावले. बीडमध्ये आमच्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांना त्यांनी पळविले होते. मी त्यावेळी युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष होतो. त्याचा निषेध म्हणून मी मुंडेसाहेबांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यामुळे मुंडेसाहेब चिडतील असे मला वाटतले होते. पण मुंडेसाहेब पोलिस अधिकाऱ्यांना म्हणाले, की एखाद्या पोराला राजकीय प्रवास करायला वीस वीस वर्षे लागतात आणि तुम्ही एका सहीने त्यांचं करिअर खराब करता. त्यांनी त्याच ठिकाणी हे प्रकरण संपविले. तो एक टर्निंग पॉईंट होता. 

 

भाजपची ऑफर! 
2001 मध्ये गोपिनाथ मुंडेसाहेबांचा एकेदिवशी सकाळी सकाळी मला फोन आला होता. मुंडेसाहेब म्हणाले होते, की मी आणि प्रमोद महाजन यांनी ठरविले आहे की तुला विधान परिषदेवर पाठवायचे आहे. तू तुझ्या बायकोशी चर्चा कर. खरेतर मी बायकोशी चर्चा केलीच नाही पण तिला सांगितले, की मी मेलो तरी पवारसाहेबांना सोडणार नाही. खरेतर आॅफर चांगली होती. मुंडेसाहबांनी मला आश्‍वासन दिले होते की तुला दोन टर्म देतो. बाळासाहेबांशी चर्चा करून फॉर्म भरू या ! खरेतर ती एक संधी होती. पण, मी तसा विचार केला नाही. शेवटी माझ्या बायकोने मुंडेसाहेबांना फोन केला आणि सांगितले, की साहेब तुमच्यावर त्यांच आणि त्यांच तुमच्यावर तेवढच प्रेम आहे. पण, तो पवारसाहेबांबाबत तडजोड करणार नाही. एकवेळ ते मला सोडेतील पण, पवारसाहेबांना सोडणार नाहीत. 

प्रश्न : केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांसारखा चेहरा भाजपकडे आहे. तसा राज्यात विरोधकांचा चेहरा कोण?

आव्हाड : या देशात चेहरा बघितला जात नाही. मोतीलाल नेहरूंची नात आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची कन्या इंदिरा गांधी यांनी देशाच्या जेव्हा आणिबाणी आणली तेव्हा लोकांनी विरोध केलाच ना ? इंदिरा गांधी यांचा त्यांच्या घरात एक लाख 80 हजार मतांनी पराभव झाला होता. गांधींविरोधात ज्या राजनारायण यांनी निवडणूक लढविली होती त्यांना केवळ बारा हजार रुपये खर्च आला होता. आणिबाणीमुळे स्वातंत्र्यांची गळचेपी झाली होती. वृत्तपत्रावर बंधने आली होती. सत्तेची मग्रुरी या देशात कधीच चालत नाही. लोक ती चालू देत नाही. हा देश प्रगल्भ आहे. 2019 मध्ये लोक निश्‍चितपणे बदल घडवून आणतील. राजकीय मग्रुरीविरोधात राग व्यक्त करतील. 

प्रश्न : जितेंद्र आव्हाड हे एक फायदब्रॅंड नेते आहेत. तरीही ते राज्यभर पक्षाच्या व्यासपीठावर फारसे दिसत नाही?

आव्हाड : पक्षात माझ्यापेक्षा खूप चांगले बोलणारे नेते आहेत. ते उत्तम पद्धतीने विचार मांडतात. त्यामुळे कदाचित मागे ठेवले जात असेल. राज्यभर फिरायला पाहिजे असे वाटणे स्वाभाविक आहे. मी शिवसन्मान परिषदेसाठी राज्यभर फिरत असतो. मोठा प्रतिसाद मिळला. लोकांनी स्वत: वर्गणी काढून परिषद यशस्वी केल्या. पक्षाने वेगळे व्यासपीठ करून दिले तर फायदाच होईल. पक्षात गळचेपी वैगेरे काही होत नाही. आपण आपले काम करीत राहायचे असते. 

वाचा मुलाखतीचा आधीचा भाग-१)इतिहासाची तोडमोड करणाऱ्यांचा कडेलोटच करायला हवा : आव्हाड

२)अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा सन्मान करणारा शरद पवार यांच्या सारखा दुसरा नेता मी पाहिला नाही : जितेंद्र आव्हाड 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख