Sharad Pawar : राहुल गांधींची खासदारकी रद्द : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी घेतली दखल; समितीचीही स्थापना

Supreme Court : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे देशातील राजकारण तापले आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama

Sharad Pawar And Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे देशातील राजकारण तापले आहे. सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणा संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे शनिवारी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राहुल गांधी यांच्या खासदारकीसंदर्भातही पवार यांनी भूमिका मांडली. या वेळी बोलताना पवार म्हणाले, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये जाणकार लोक, सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) निवृत्त न्यायाधीश नेमून या सर्वांनी सखोल अभ्यास करून वस्तुस्थिती मांडावी, याची नोंद घेण्याची आवश्यकता मला वाटते.

Rahul Gandhi News
Jayant Patil News : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले...

पवार म्हणाले, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी हे या ठिकाणी पहिल्यांदाच सांगत आहे. न्यायालयाने या संदर्भात भूमिका घेतली आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले, महागाई आणि बेरोजगारी हे विषय देशातील सामान्य माणसाचे बजेट संपूर्ण कोलमडून टाकणारे आहे. यासाठी संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. वेगवेगळे विरोधी राजकीय पक्ष यासंबंधीचा कार्यक्रम हाती घेत आहेत.

देशात उद्योग गुंतवणुकीचे वातावरण तयार केले पाहिजे. यातून नवीन क्षेत्र तयार होऊन अनेक हातांना काम मिळत असेल तर या गोष्टींबद्दल जाणकारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे माझे मत आहे. चौकशी करणाऱ्या संस्थांचा गैरवापर केला जातो अशी चर्चा देशात आहे. त्यासंबंधी काही लोकांनी एक लेखी पत्र देशाच्या राष्ट्रपतींना दिले आहे.

Rahul Gandhi News
Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये 'सावरकर गौरव यात्रे'च्या तारखेत बदल

त्यात उदाहरणेही देण्यात आली आहेत. सत्तेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेत्यांना कसा त्रास दिला जातो हे आम्ही मांडले, मांडत आहोत आणि मांडणार!, असे पवार यांनी स्पष्ट केले. लोकांसमोर निवडणुकीला जाताना जे राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न आहेत ते मांडणे व त्यातून जनमत अनुकूल करून घेणे ही भूमिका विरोधी पक्ष म्हणून आम्हा लोकांची राहील, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सदस्यत्व रद्द करण्याच्या तरतुदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. केरळमधील रहिवासी असलेल्या आभा मुरलीधरन यांनी राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा हवाला देत याचिका दाखल केली आहे. याचिकेत महिलेने लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 8(3) असंवैधानिक घोषित करण्याची मागणी केलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com