Devendra Fadnavis : 'देवेंद्र फडणवीस भूषण की कलंक ?' ठाकरेंना उद्देशून नागपूरात झळकावला भलामोठा फलक

Nagpur Flex : नागपूरात उद्धव ठाकरेंना उद्देशून उपस्थित केला प्रश्न
Flex in Nagpur
Flex in NagpurSarkarnama

Nagpur News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत असे म्हटले होते. यानंतर भाजप आक्रमक होऊनही ते आपल्या मतावर ठाम राहिले. परिणामी ठाकरे-भाजपमध्ये कलंक शब्दावरून कलगीतुरा रंगला होता. नागपूरमधील फडणवीसांच्या एका चाहत्याने 'कलंक' शब्दावरून फलक लावून ठाकरेंना प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी विदर्भातील भाजप आणि ठाकरे गट या फलकांना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

Flex in Nagpur
Nagpur News : अजित पवार म्हणाले होते, ‘अमोल, असलं काही ट्विट वगैरे करू नको बाबा…’ पण मिटकरींनी त्यांचंही ऐकलं नाही !

फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर शहरात ठिकठिकाणी काही फलक लावले आहेत. त्यावर फडणवीस यांनी आतापर्यंत केलेल्या एका-एका कामाचा उल्लेख केला असून त्याखाली देवेंद्र फडणवीस भूषण की कलंक ? असा प्रश्न थेट ठाकरेंना विचारण्यात आला आहे. यावर फक्त फडणवीसांचा फोटो आणि त्यांनी केलेल्या कामांची माहिती दिलेली आहे. यातून फडवीस राज्यासाठी 'भूषण' ठरल्याचा दावा करण्याचा प्रयत्न चाहत्याने केला आहे.

Flex in Nagpur
Irshalwadi Landslide: उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत; लोकांना दिला धीर, पुनर्वसनासाठीही पुढाकार
Flex In Nagpur
Flex In NagpurSarkarnama

या फलकावर फडणवीसांच्या एका चाहत्याने, "शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण?" असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला आहे. विषेश म्हणजे, या फलकावर फडणवीसांच्या किंवा भाजपचा कसलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र यावर ना भाजपचा उल्लेख ना कुणाचा फोटो छापला, त्यामुळे हा फलक नेमका कुणी लावला, अशी चर्चा शहरभर सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com