Pune Loksabha ByPoll Election : काँग्रेस नेत्याचं मोठं विधान,पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणारच!

Congress News : ...त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत.
Nana Patole, Girish Bapat
Nana Patole, Girish BapatSarkarnama

Vijay Wadettiwar News : भाजप नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं बुधवारी(दि.२९) निधन झालं. बापट यांच्या निधनाला तीन दिवस झाले नाही तोच पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. याचदरम्यान, आता माजी मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Nana Patole, Girish Bapat
Sanjay Raut On Riot: '' छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत...''; संजय राऊतांचा गंभीर आरोप

तसेच भाजप प्रत्येक पोटनिवडणूक आमच्याविरोधात लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. आणि ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे अशी रोखठोक भूमिका वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे.

यावेळी विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी राहुल गांधी यांची रद्द करण्यात आलेल्या खासदारकीवरही प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले, राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईविरोधात आम्ही आजपासून देशभरात जेलभरो आंदोलन करत आहोत. देशभरात 50 लाख लोक जेलभरो आंदोलन करणार असून राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात लोक आंदोलन करणार आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Nana Patole, Girish Bapat
Lalit Kumar Modi Tweet : मोदींकडून नेहरुंचा तो फोटो शेअर ; नव्या वादाला तोंड फुटलं ; काँग्रेस आक्रमक..

राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने पायावर धोंडाच मारून घेतला आहे. जोपर्यंत भाजपचं सरकार खाली खेचणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

किराडपुरा घटनेची सखोल चौकशी व्हावी...

संभाजीनगर किराडपुरा येथे झालेल्या हिंसाचारावर मोठं विधान केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, संभाजीनगरातील दंगल म्हणजे मतांचं ध्रृवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कट करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घडवलेली दंगल आहे. माणसं पेरून दंगल घडवली. या घटनेची सखोल चौकशी व्हावी. कुठल्याही धर्माचे असोत, दोषींवर कारवाई केली पाहिजे असंही वडेट्टीवार म्हणाले.

.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com