
Congress News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. देशभरात काँग्रेसने (Congress) आंदोलन केले आहे. तर भाजपनेही ओबीसींचा अपमान झाला, असल्याचे म्हणत आंदोलन केले आहे. भाजपच्या आंदोलना काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार निशणा साधला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, देशातील ओबीसी समाजाचे सगळ्यात मोठे नेते म्हणजे नीरव मोदी आणि ललित मोदी. राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केल्यामुळे भाजपमधील (BJP) ओबीसी नेत्यांचा अपमान झाला. त्यामुळे देशाला लुटून गेलेले नीरव मोदी आणि ललित मोदी यांना सन्मानाने देशात आणण्याची गरज आहे असा खोचक टोला वडेट्टीवार भाजपला लगावला.
वडेट्टीवार म्हणाले, या आंदोलनाच्या निमित्ताने ललित मोदी आणि नीरव मोदी यांना देशात परत आणले पाहिजे, कारण हे दोघे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. देशाला लुटून हे दोन्ही ओबीसीचे नेते पळून गेल्यामुळे भाजप नाराज झाली आहे. तसेच ओबीसी समाजाला यांच्यामुळे फार मोठ तोटा झाला. ललित मोदी आणि नीरव मोदी यांनी परत आणावे. पुन्हा आम्ही या दोघांना चोर मानणार नाही. या दोघांना आम्ही आमचे नेते मानू, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
ललित आणि नीरव तुम्ही कितीही वेळा देशाला लुटून घेऊन गेला तरी आम्ही तुम्हाला माफ करू, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. ललित आणि नीरव यांनी भारतात लवकर परत यावे, कारण ओबीसी समाज त्यांची आतुरतेने पाहत आहे. राहुल गांधी यांनी या दोघांचा अपमान केल्यामुळे भाजपमधील ओबीसी समाजाचा अपमान झाला, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.
त्यामुळे सध्या तुमच्या भाषणाची देशाला गरज आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ भारतात या, असा टोला भाजप लगावत त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. भारताला लुटणाऱ्यांवर टीका करायची नाही, अशा सरकारमुळेच ललित व नीरव तुमचे स्वागत करण्याची वेळ आली. भाजपला ही दोन माणसे प्रिय असून या दोन्ही माणसांचे फोटो लावून त्यांचे जोरदार स्वागत केले पाहिजे, असेही वडेट्टीवर म्हणाले. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे. देशातील लोकशाहीचा प्रवास हा हुकूमशाहीकडे चालू झाला आहे. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने हेच दाखवून दिले की कायद्याला आम्ही मानत नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी भाजपवर केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.