Bachchu Kadu : आज भूमिका जाहीर करणार : कार्यकर्त्यांच्या भावना मात्र संतप्त!

Bachchu Kadu : आज बच्चू कडू कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत.
Ravi Rana-Bachu Kadu
Ravi Rana-Bachu KaduSarkarnama

मुंबई : अमरावती जिल्ह्यातलं राजकारणात मागील काही दिवसांपासून चांगलेच तापलेले दिसून येत होते. आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरण सरकारला आव्हान देण्यापर्यंत गेले. राणांनी आरोप मागे घेतले नाही तर सात-आठ आमदार आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले होते. शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या दोघांच्या वादात मध्यस्थी करावी लागली.

Ravi Rana-Bachu Kadu
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज फैसला होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणा आणि कडू या दोघांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत दोघांचीही हा वाद संपुष्टात आणण्यात समजूत घालण्यात आल्याचे समजते. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोघांनीही आपल्यातील कटुता संपवून त्यांच्यात मनोमिलन घडवण्यात आले आहे. यानंतर राणांनी या वादावर आता पडदा टाकत आपल्याकडून झालेल्या आरोपांवर दिलगीरी व्यक्त केली.

Ravi Rana-Bachu Kadu
आर्यन खान प्रकरणाचा तपास करणाऱ्या ज्ञानेश्वर सिंह यांची थेट उत्तर भारतात बदली

दरम्यान, रवी राणा यांच्याकडून बच्चू कडूंवर गुहाहाटीला जाऊन खोके घेतल्याचा आरोप केला गेला होता. यावर बच्चू कडू आक्रमक झाले होते. यावर आता कडू यांचे प्रहार संघटनेचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले दिसून येत आहेत.

कार्यकर्ते आज याबाबत आंदोलन करणार असल्याचे समजत आहेत. आज बच्चू कडू कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. आज आपली भूमिका बच्चू कडू जाहीर करतील. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com