Ram Shinde & Rohit Pawar News : आमदार राम शिंदेंच्या आवाहनानंतर रोहित पवार 'चौंडी'ला जाणार का?

Ahmednagar Politics: '' नवीन पायंडा पाडण्याची गरज काय? ''
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Ahmednagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम चौंडी (ता. जामखेड) येथे बुधवारी(दि.३१) होत आहे. या कार्यक्रमावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सामंजस्याची भूमिका घेत स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचा निर्णय मागे घेतला.

यानंतर आता भाजप नेते व आमदार राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यक्रमात कोणीही राजकारण आणू नये. शासकीय कार्यक्रम पत्रिकेत आमदार रोहित पवारांचं नाव टाकलं आहे. त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावं. आम्ही त्यांचं स्वागतच करु असं आवाहन केलं आहे. यामुळे होळकर यांच्या जयंती उत्सवावरील वादावर पडदा पडला आहे. मात्र, आता राम शिंदे यांच्या आवाहनानंतर पवार हे चौंडी येथे कार्यक्रमाला जाणार का याविषयी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Rohit Pawar
Municipal Commissioner G. Shrikant: मनपा आयुक्तांचा अनोखा उपक्रम, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ठेवली पार्टी..

भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात नेहमीच कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळत असते. याचदरम्यान, चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावरुन पवार-शिंदे यांच्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह होती. मात्र, दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे या कार्यक्रमावरील वादाचं सावट दूर झालं आहे. आता शिंदे यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन रोहित पवारांना केलं आहे.

राम शिंदे नेमकं काय म्हणाले ?

भाजप नेते व आमदार राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवावर भाष्य केलं आहे. शिंदे म्हणाले, कर्जत जामखेड मतदारसंघ हा सध्या रोहित पवारांचा असला किंवा पुर्वीचा माझा जरी असला तरी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण येता कामा नये. अतिशय विशाल विचारानं होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी.

Rohit Pawar
RanjitSinnh Nimbalkar News: जनतेशी कमी झालेला संपर्क रणजितसिंह निंबाळकरांना अडचणीचा ठरणार?

तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी लोकप्रतिनिधी म्हणून रोहित पवारांनी घ्यायला हवी. होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सर्वसमावेशक नावं टाकण्यात आली आहे. त्यात आमदार रोहित पवारां(Rohit Pawar) चं देखील नाव आहे. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमात त्यांनी सहभागी व्हावं. आम्ही त्यांचं स्वागतच करु असंही आमदार राम शिंदे यावेळी म्हणाले.

तिथे श्रध्देचा व भाविक भक्तांचा प्रश्न असतो. तिथे संपू्र्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. त्याचे परिणाम फक्त त्या गाव,परिसरापुरता नाही तर राज्यभर होत असतात. या ठिकाणी राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील येऊन गेले आहेत. यंदाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे येणार आहेत.

Rohit Pawar
Ram Shinde News: आमदार राम शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल

नवीन पायंडा पाडण्याची गरजच काय?

अहिल्यादेवी होळकरां(Ahillyabai Holkar)ची जयंती ही ३१ तारखेला असते. आणि तिथे ३० तारखेला कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नसतो. पण त्यांनी यावर्षी ३० तारखेला कार्यक्रमाची घोषणा करत नवीन पायंडा पाडला आहे. पण हे ते कशासाठी करत आहे माहिती नाही. मात्र, कोणत्याही राष्ट्रपुरुषांची जयंती आपण त्यांच्या ठरलेल्या दिवशीच करतो. मग आता अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीत नवीन पायंडा का पाडला जात आहे हे समजत नाही. मागील वर्षी त्यांनी जयंतीचा कार्यक्रम घेतला. त्यात आम्ही कोणताही व्यत्यय आणला नाही. त्यांनीही दुसरा कार्यक्रम न घेता आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहनही शिंदे यांनी यावेळी केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com