Eknath Shinde News : अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्याच्या वादावर मुख्यमंत्र्यांचे प्रथमच भाष्य

मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ते स्वतः त्याचा खुलास करणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आल्याने महाराष्ट्रात नवा वाद सुरू झाला. विरोधी पक्षांकडून भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ले चढविण्यात येत आहेत. त्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ते स्वतः त्याचा खुलास करणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. (CM comment on controversy over removal of statues of Ahilya Devi and Savitribai Phule)

Eknath Shinde
Sambhaji Raje News : मी तसलं काही केलं नाही, त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही : संभाजीराजेंनी ठणकावले

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर (veer sarvarkar) यांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली. तो जयंती सोहळा आता चांगलाच चर्चेत आला आहे. कारण, ज्या ठिकाणी सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याच्या शेजारी एका बाजूला अहिल्यादेवी होळकर, तर दुसऱ्या बाजूला सावित्रीबाई फुले यांचा पुतळा होता. मात्र, जयंती साजरी करताना हे दोन्ही पुतळे हलविण्यात आले आहेत.

Eknath Shinde
Chhagan Bhujbal News : 'सावित्रीबाई-अहिल्याबाईंचे पुतळे सरकारला सहन होईना'; भुजबळांना झाल्या वेदना...

सावरकरांची जयंती साजरी करताना ही दोन्ही पुतळ हटविण्यात आला असल्याचा आरोप राज्यातील विरोधी पक्ष करीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. त्यातून महाराष्ट्रात नवा वाद निर्माण होण्याची भीती आहे. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी खुलासा केला आहे.

Eknath Shinde
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात केवळ दहा जागा मिळतील : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे भाकीत

मुख्यमंत्री म्हणतात की, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या आमच्यासाठी पूजनीय आणि आदरणीय आहेत. त्यांचाविषयीचा आदर प्रत्येक देशवाशियांच्या मनात भलेला आहे. त्यांचा अनादर करण्याचे कोणतेही काम आमच्याकडून होणार नाही. मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ते स्वतः त्याचा खुलास करणार आहेत. या प्रकरणी कोणीही गैरसमज करून घेऊ नये. सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या आमच्यासाठी आदरास्थानी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com