Sujay Vikhe Patil News : ''...तरच आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळेल !''; खासदार विखेंनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

Ahmednagar Political News : 'पार्टी विथ डिफरन्स' अशी भारतीय जनता पक्षाची ओळख राहिलेली आहे.
Sujay Vikhe Patil News
Sujay Vikhe Patil NewsSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे -

Ahmednagar : आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचं असून यासाठी गाव पातळीपासून जनजागृती करणं सुरू आहे. निवडणुकांमध्ये बूथ कमिटी हे बलस्थान असून ती सक्षम करणं गरजेचं आहे. त्यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न करणं सुरू आहेत. बूथ कमिटी सक्षम झाली तर आगामी लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के विजय निश्चित असल्याचं मत नगरचे भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

भाजप संयुक्त मोर्चा संमेलनांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. सुजय विखे पाटील म्हणाले, 'मोदी @9' या भाजपाच्या एक महिन्या जनसंपर्क अभियानाच्या काळात पक्षाने दिलेले सर्व जनसंपर्काचं कार्यक्रम यशस्वी पार पाडले आहेत. या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांनी देखील उस्फूर्त सहभाग घेतला. या विविध कार्यक्रमातून जनसंपर्काबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी केलेले कार्य, गरीब कल्याणकारी योजना याबाबत जनतेत जनजागृती केली असंही खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले.

Sujay Vikhe Patil News
Thackeray Group: पालिका अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण ठाकरे गटाला भोवणार? फडणवीसांनी दिला थेट कारवाईचा इशारा

भारतीय जनता पक्षासाठी 2024 ची लोकसभा निवडणूक ही अति महत्त्वाची मानली जात आहे. विशेष करून भाजपला ज्या राज्यातून समर्थन मिळत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे आणि त्यामुळेच पक्षानं उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित केलेले दिसून येतंय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात केलेला कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत पुन्हा एकदा 2024 च्या लोकसभा निवडणुकी(Election)साठी भारतीय जनता पक्ष निवडून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

'पार्टी विथ डिफरन्स' अशी भारतीय जनता पक्षा(BJP)ची ओळख राहिलेली आहे. त्या अनुषंगाने आता पुन्हा एकदा नेता ते कार्यकर्ता ते मतदार अशी मोहीम राबवली जात असून आता थेट नेतेच कार्यकर्त्यांसोबत मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी पक्षाने विविध पातळीवर वेगवेगळे बूथ नियोजित केलेले असून त्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होईल हे पाहिले जात आहे.

Sujay Vikhe Patil News
Thackeray Group Suraj Chavan ED Inquiry : तब्बल साडे आठ तासांनंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची ईडी चौकशी संपली

यावेळी पक्षनिरीक्षक उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. व्यासपीठावर आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष महेन्द्र गंधे, जिल्हा प्रभारी भानुदास पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com