
Yeola APMC Election: येवला बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार नरेंद्र दराडे यांनी पॅनेल केले आहे. मात्र ते स्वतः उमेदवार झाले नाहीत. त्यांनी स्वतः उमेदवारी करायची होती. त्यानंतर त्यांना त्यांची खरी जागा कळली असती. जागा अडवणाऱ्यांना मतदार व कार्यकर्ते बाजूला करतात याचा अनुभव त्यांना आला असता, अशी टिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Yeola APMC election politics heated up due to alligation)
येवला (Yeola) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे (Shivsena) आमदार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांनी परस्परांवर गंभीर टिकास्त्र सोडले आहे. त्यामुळे येवला मतदारसंघातील वातावरण चागंलेच तापले असुन ही निवडणूक प्रतिष्ठेची, भविष्यातील राजकारणाला नवे वळण देणारी ठरेल.
बाजार समितीच्या प्रचारासाठी श्री. भुजबळ यांची नुकतीच एक सभा येवल्यात झाली. त्यात त्यांनी शिवसेनेचे आमदार दराडे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्याचे राजकीय पडसाद उमटले. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र चांगलाच रंग भरला आहे.
श्री. भुजबळ म्हणाले, आमदार दराडे यांनी चर्चेला येताच मी अमक्याला मत देणार नाही, तमक्याला मतदेणार नाही असे सांगण्यास सुरवात केली. खरे तर मी त्यांना काहीही विचारले नव्हते. त्यामुळे त्यांनी `मेरी झांसी नही दुंगी` अशा अविर्भावात वागायला नको होते. ते बोलले त्यामुळे आम्हीही म्हणालो `ठिक आहे, चहा पाणी घ्या आणी जा`
ते पुढे म्हणाले, सार्वजनिक पदांवर जर तुम्हाला नेमले आणि दहा वर्षे तुम्ही त्या पदावर राहिलात, तर सगळ्यांना ती संधी मिळावी या भूमिकेत चुक काय?. इतरांनी ऐकायचे, तुम्ही मात्र ऐकायचे नाही. हे योग्य नाही. आता आमदार दराडे यांनी पॅनल केले आहे. मात्र ते स्वतः उभे राहिले नाहीत. (Political Breaking News)
श्री. भुजबळ म्हणाले, त्यांच्यात सहा उमेदवार असे आहेत, की ज्यांना स्वतःला मताचा अधिकार देखील नाही. उभे रहायचे म्हणून उभे रहायचे. छगन भुजबळांना घालवण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत, असे ते सांगत आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, मर्चंट बँक कोणी घालवली? जिल्हा मजूर फेडरेशन दोन्ही ठिकाणाहून देखील आम्ही लक्ष घातले आणि तुम्हाला घालवले. शेवटी माझं आणि त्यांचं वैर तरी काय आहे. संस्थांचा विकास व्हावा हे आमचे धोरण आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.