Nashik Crime News : भाजप कामगार आघाडीच्या शहराध्यक्षावर गोळीबार; नाशिकमध्ये एकच खळबळ

BJP News : गोळीबार करणारा हा सराईत गुन्हेगार आहे....
Nashik Crime News
Nashik Crime NewsSarkarnama

Nashik : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बाजीप्रभू चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राकेश कोष्टी असं त्यांचं नाव असून ते भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष आहेत. या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष राकेश कोष्टी(Rakesh Koshti) यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात कोष्टी यांच्या पोटाला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. जया दिवे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Nashik Crime News
Asaduddin Owaisi News : अतिक व अश्रफ अहमदच्या हत्येनंतर ओवैसींचा योगी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले,त्यांना देशभक्त..?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कोष्टी यांच्यावर गोळीबार करणारा हा सराईत गुन्हेगार आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. आपआपसांतील वादातून ही गोळीबाराची घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Nashik Crime News
Atique Ahmad News : अतिकच्या आयुष्याची चित्तरकथा..; वडील टांगा चालवायचे, मुलाने १७ व्या वर्षी केला पहिला खून ; महागड्या मोटारी..

संशयित हल्लेखोरांकडून दोन राउंड फायर करण्यात आले आहेत. त्यात राकेश कोष्टींच्या पोटाला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शहरात एकच तणाव निर्माण झाला. या हल्ल्यानंतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगानं फिरवली असून आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी जंग जंग पछाडले आहे.

(Edited By DeepaK Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com