Asaduddin Owaisi News : अतिक व अश्रफ अहमदच्या हत्येनंतर ओवैसींचा योगी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले,त्यांना देशभक्त..?

Atique & Ashraf Ahmed Shot Dead : गँगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनावर सवाल उपस्थित केले जात आहेत.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi sarkarnama

Asaduddin Owaisi On Atique & Ashraf Ahmad Murder : माजी खासदार व गँगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात नेताना आणि पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे.

मात्र, या घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही अतिक अहमद व अश्रफ अहमद यांच्या हत्येनंतर योगी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

Asaduddin Owaisi
Atique Ahmed news: आतिक आणि अश्रफची हत्या का केली? हल्लेखोरांनी सांगितलं धक्कादायक कारण...

गँगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनावर सवाल उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी(Asaduddin Owaisi) यांनी देखील अहमद बंधूंच्या हत्येवरुन संताप व्यक्त केला आहे.

ओवैसी म्हणाले, गोळ्या घालून धार्मिक घोषणा कशाला देता. त्यांना दहशतवादी नाही तर काय देशभक्त म्हणणार का? त्यांना फुलांचा हार घालणार का? असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, जे लोक टीव्ही स्टुडिओत बसून आनंदोत्सव साजरा करत होते, तुम्ही गिधाडं आहात. तिथं पडलेले मृतदेह खासदाराचा आहे. आज भाजपची सत्ता आहे, उद्या दुसरी कोणाची असेल, हे तुम्ही विसरत आहात. या हत्येला दहशतवादाचं नाव देणार नाही, तर काय मारेकऱ्यांना देशभक्त म्हणणार का, त्यांना हार घालणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

Asaduddin Owaisi
Andhara Pradesh Politics: मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींचे काका भास्कर रेड्डींना अटक; काय आहे प्रकरण?

याचा उत्तर प्रदेश सरकारशी काही संबंध नाही, तर मग ते कट्टर कसे झाले, त्यांच्याकडं इतकी शस्त्रं कुठून आली? एकाचवेळी गोळ्या झाडल्या जात असून त्यांना कुठंही अडवण्यात आलं नाही. ते मूलतत्त्ववादी आहेत आणि भाजप त्यांना संरक्षण देत आहे असा आरोपही ओवैसींनी केला. उद्या हाच तांडव मानवतेवर होणार आहे. अशामुळं लोकशाही यशस्वी होणार आहे का, संविधान मजबूत होईल का? असंही ओवैसी म्हणाले.

स्वरा भास्करचं टि्वट काय ?

अभिनेत्री स्वरा भास्करने देखील गँगस्टार अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांच्या हत्येवर कठोर शब्दांत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. स्वरा भास्कर म्हणाले, कायदेशीर अधिकाराशिवाय एखाद्या व्यक्तीची जाणीवपूर्वक हत्या किंवा एन्काऊंटर ही काही साजरी करण्यासारखी गोष्ट नाही. ही अराजकतेची स्थिती दर्शवते.

Asaduddin Owaisi
BRS Rally News : छत्रपती संभाजीनगरातील केसीआर यांच्या सभेसाठी मैदानाची पाहणी...

राज्यातील संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, हे यातून सूचित होतं. कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत आणि गुन्हेगारांना सक्षम करत आहेत. याला भक्कम शासन म्हणता येणार नाही, ही अराजकता आहे असं तिने ट्विट केलं आहे.

स्वरा भास्करच्या पतीचाही हल्लाबोल...

समाजवादी पार्टीचा नेता व स्वरा भास्करचा पती आणि फहाद अहमद यानेसुद्धा याप्रकरणी ट्विट केलं आहे. अनेकांना वाटेल की, आम्ही मुस्लिम आहोत म्हणूनच आम्ही असद अहमदच्या एन्काऊंटरला विरोध करत आहोत. मात्र, हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही विकास दुबेच्या एन्काऊंटरचंसुद्धा समर्थन केलं नव्हतं आणि कधी करणारही नाही. मला तुमच्याशी समस्या आहे. तुमचा राज्यघटना आणि संस्थांवर विश्वास नाही असं म्हटलं आहे.

Asaduddin Owaisi
Imtiaz Jalil On Atique, Ashraf Shot Dead : अतिक, अश्रफच्या हत्येनंतर इम्तियाज म्हणाले, जंगलराजमध्ये तुमचे स्वागत..

फक्त हुकूमशाही येईल...!

तसेच असदचं प्रकरणं एकदम स्पष्ट होतं. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असती आणि तो आयुष्यभर तुरुंगात राहिला असता. जर तुरुंगातून त्याने गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला सरकार जबाबदार असती. बुलडोझरने किंवा एन्काऊंटरने गुन्हेगारी संपेल या भ्रमात तुम्ही लोकं आहात. पण बुलडोझर आणि एन्काऊंटरने फक्त हुकूमशाही येईल बाकी काही नाही असं फहाद अहमद म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com