Eknath Khadse On Shivsena : शिंदे गटाबाबत एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "भाजपात जाण्याचा निर्णय..."

Shinde Group Join BJP : "शिंदे गटातील आमदारांमुळे भाजपचे स्थानिक नेते दुखावणार"
Eknath Khadse, Eknath Shinde, Kishor Patil
Eknath Khadse, Eknath Shinde, Kishor PatilSarkarnama

Jalgaon News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिले तर आम्ही कमळ चिन्हावरही निवडणूक लढवू, असे प्रतिपादन आमदार किशोर पाटलांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी टोला लागावत शिंदे गटाचा समाचार घेतला आहे. भाजपकडून लढण्याचा शिंदे गटाचा आजचा निर्णय नसून तो पूर्वीचाच असल्याचे खडसेंनी म्हटले आहे. या खोचक टोल्यामुळे शिंदे गटाकडून खडसेंना काय प्रत्युत्तर मिळणार, याकडे आता लक्ष आहे. (Latest Political News)

Eknath Khadse, Eknath Shinde, Kishor Patil
Rane Vs Raut : कोण विनायक राऊत? काय त्यांची औकात?; राणेंनी उडवली खासदाराच्या उपोषणाची खिल्ली

पाचोरा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले होते की, पक्षाचे नेते मुख्यमंत्री शिंदेंनी निर्णय घेतला तर आपण कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार आहोत. पाटलांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यानंतर शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा काय निर्णय येणार, याबाबत राज्यभरातून अनेक चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंनी शिंदे गटाची चांगलीच फिरकी घेतली आहे.

Eknath Khadse, Eknath Shinde, Kishor Patil
Nawab Malik News: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची नवाब मलिकांसाठी 'फिल्डिंग'; पण मलिक घेणार 'हा' निर्णय?

एकनाथ खडसे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "शिंदे गटाचे आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय झाल्यासारखा आहे. यापूर्वीही शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर पुढे काय? याबाबत चर्चा झडल्या आहेत. त्यांना दोनच पर्याय राहतात, एक म्हणजे त्यांनी गट स्थापन करणे आणि दुसरा म्हणजे त्यांनी एखाद्या पक्षात सहभागी होणे."

भाजपमध्ये गेले तर शिंदे गटातील आमदारांना फायदा होणार असल्याचेही सांगून भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याचेही खडसेंनी सांगितले. ते म्हणाले, आता भाजपमध्ये गेले तरच या आमदारांची अपात्रततेची कारवाई वाचू शकते. आज तरी भाजपात जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. मात्र भाजपकडून निवडणूक लढविण्याचे तयारी करीत असणाऱ्यांची अडचण होणार आहे. पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदेंसारख्या अनेक इच्छुकांचे काय होणार? सध्या तरी असे वाटते शिंदे गटाचे सर्व आमदार भाजपमध्ये जातील हे निश्चित."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com