NCP; सुरगाणा गुजरातला जोडण्याच्या मागणीने राष्ट्रवादीला आणले अडचणीत?

या भागाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवारांवर स्वपक्षातूनच प्रश्नचिन्ह.
NCP delegation at Surgana
NCP delegation at SurganaSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तालुकाध्यक्ष चिंतामण गावीत (Chintaman Gavit) व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्याच्या सीमावर्ती (Maharashtra) भागातील सुरगाणा (Surgana) तालुक्यातील प्रश्न मांडले. हे करताना त्यांनी या भागात विकास होत नसल्याने तो गुजरातला (Gujrat) जोडण्यात यावा अशी मागणी करून नवा वाद निर्माण केला आहे. या भागाचे आमदार नितीन पवार (Nitin Pawar) व राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. (NCP local leaders deemand Surgana shall join in Gujrat)

NCP delegation at Surgana
NCP Pune : कोश्यारी 'गो बॅक' साठी राष्ट्रवादीची रणनीती, प्रशांत जगतापांची पोलिसांना हूल

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद तीव्रतेने पुढे येत आहे. त्याबाबत राजकीय पक्ष आक्रमक आहेत. बेळगाव, कारवारचा प्रश्न अनेक वर्षे धगधगत असताना महाराष्ट्रातील सांगलीची चाळीस गावे कर्नाटकला जोडण्याची मागणी कर्नाटकातील भाजपचे सरकारचे मुख्यमंत्री बोम्मईंनी केली होती. त्यातच दोन दिवसापूर्वी जत तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी त्यांनी पाणी सोडले होते. यावरून दोन्ही राज्यात वाद निर्माण झाला आहे.

NCP delegation at Surgana
Maharashtra- karnatak Border Dispute : जत तालुक्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरगाणा तालुका अध्यक्ष चिंतामण गावीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. त्यात सुरगाणा तालुक्याच्या विविध प्रश्नांचा उल्लेख करीत विकास होत नाही. हा भाग अनेक वर्षे दुर्लक्षीत आहे. त्यामुळे येथे विकास होत नसल्याने तालुक्यातील काही सीमावर्ती गावे गुजरातला जाडावेत अशी मागणी केली. त्यांची ही मागणी अतिशय सामान्य स्वरूपाची होती. मात्र त्यातून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकने काही गावांवर दावा केला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनेच त्याला अनुकुल व बळ देणारी भूमिका घेत गुजरातचे कौतुक करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

या बातमीची लगेचच सर्व भागात चर्चा सुरु झाली आहे. या निवेदनात सुरगाणा तालुक्यात आदिवासी नागरिकांच्या व अतिदुर्गम भाग अविकसित आहे. पावसाळ्यात या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. मोबाईल फोनला कनेक्टीव्हीटी नसते. सरकारी, महसुल शैक्षणीक विभाग त्याकडे दुर्लक्ष करतो. शासकीय कर्मचारी येथे मुक्कामी रहात नाहीत. शिक्षक शाळेवर जात नाहीत. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. 75 टक्के भागात मोबाईल नेटवर्क नाही. त्यासाठी अनेकदा मागणी करूनही टॅावर उभारले जात नाहीत. वीजेचा पुरवठा सुरळीत नसतो, या येथील समस्या आहेत. या समस्या रास्त आहेत. यापूर्वी नागरिकांनी सहन केले, नवी पिढी ते सहन करण्यास तयार नाहीत. त्यासाठी राज्य सरकार, जिल्हा यंत्रणा सक्रीय करावी लागेल. मात्र हा भाग गुजरातला जोडा हा पर्याय होऊ शकत नाही.

यासंदर्भात श्री. गावीत यांसह नवसू गायकवाड, रनजीत गावीत, मनोज शेजोळे, गंगाराम ठाकरे, राजेंद्र गावीत आदींच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर सह्या आहेत. त्यांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्र व गुजरातच्या गावांतील व्यवस्था व सुविधांची तुलना केली आहे. शेजारच्या राज्यात चांगले रस्ते, पाणी, वीज आदी सुविधा आहेत. महाराष्ट्रात मात्र दुर्दशा व उखडलेले रस्ते, पाण्याची वाणवा, वीजेचा दुष्काळ, रोजगाराचा अभाव आदींची मांडणी केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनालाही आत्मपरिक्षण करावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com