कळवण- सुरगाण्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

आमदार नितीन पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकंडे मागमी केली.
Nitin Pawar
Nitin PawarSarkarnama

कळवण : शंभर टक्के आदिवासी (Trible) तालुके असलेल्या कळवण व सुरगाणा या दोन्ही तालुक्यात गेल्या सप्ताहात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) व नदी- नाल्यांच्या पूरपाण्यामुळे शेतीपिकांचे तसेच शेतातील बांधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कळवण- सुरगाणा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी केली. (MLA Nitin Pawar deemands drought in Kalwan, Surgana)

Nitin Pawar
सत्तांतरानंतरही नाशिकमध्ये भुजबळांचेच ग्लॅमर अन् रुबाब!

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Nitin Pawar
एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून भाजपने बाजार समित्यांची विधानसभा केली!

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच- सहा दिवसांपासून कळवण, सुरगाणा तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत असून, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदी- नाल्यांना पूर येऊन शेती व इतर मालमत्तेचे नुकसान झाले असून, पेरणी केलेली पिके पाण्याखाली आली आहेत. शेतकरी हा अस्मानी संकटात सापडला आहे. कळवण तालुक्यात १ ते १० जुलैच्या दरम्यान १७८.३३ मिमी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे आदिवासी भागातील नदी, नाले व डोंगर उतारालगतच्या जमिनीचे नुकसान झाले असून, शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व चाळीतील कांद्याचे नुकसान झाले. खरीपाची पेरणी केलेली पिके वाहून गेल्याने दुबार पेरणीचे संकट असून, आता या शेतकऱ्यांसमोर नव्याने बियाणे खरेदी करणे, शेती मशागत करण्यासाठी लागणारी खते, मजुरीचा प्रश्‍न आहे.

अतिवृष्टीमुळे कळवण- सुरगाणा तालुक्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यातीलच शेतकरी संकटात आला आहे. शेतकरी बांधवांना संकटातून उभे राहण्यासाठी तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला सानुग्रह अनुदान उपलब्ध करून द्यावे.

- नितीन पवार, आमदार, कळवण- सुरगाणा

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in