BJP News : सावरकर स्मारकावरून भाजपची 'एमआयएम'वर कुरघोडी; घेतला 'हा' निर्णय

MLA Faruk Shah : स्मारक नूतनीकरणासाठी आमदार शाहांनी दिला २० लाखांचा निधी
Dhule Corporation
Dhule CorporationSarkarnama

Dhule BJP News : शहराच्या देवपूर भागातील स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्या स्मारकासाठी ५० लाखांची तरतूद करण्याचा ठराव सोमवारी (ता. १२) महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपकडून मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे या स्मारकासाठी इतर कुणाचाही निधी वापरू नये, 'एनओसी' देऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत. भाजपच्या या सूचनांमुळे जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

धुळे महापालिकेच्या महासभेपुढे महापौरांच्या पत्रानुसार विकास शुल्क निधीतून शहरातील अत्यावश्‍यक व महत्त्वाची कामे निश्‍चित करण्याचा विषय होता. यावर महापौर प्रतिभा चौधरी यांनी काही कामे निश्‍चित केल्याचे सभेत जाहीर केले. यात देवपूर भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक तसेच इतर कामांचा समावेश करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केल्याचे महापौर चौधरी यांनी सांगितले.

Dhule Corporation
Shivsena Advertisement News : शिंदे अन् फडणवीस दोघेही ताकदीचे नेते; जाहिरातीवरून उदय सामतांची सारवासरव

या विषयावर बोलताना नगरसेवक शीतल नवले यांनी इतर कुठलाही निधी यासाठी वापरू नये, अशी मागणी केली. प्रदीप कर्पे यांनी आपण महापौर असताना ३० लाखांची तरतूद केल्याचे तसेच स्मारकाचा आराखडाही तयार केल्याचे सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्मारकाच्या दुरवस्थेप्रश्‍नी धुळे मनपातील (Dhule) सत्ताधारी भाजपवर (BJP) टीका करण्यात आली होती. त्या टीकेनंतर धुळे शहराचे एमआयएमचे (AIMIM) आमदार फारूक शाह यांनी या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी २० लाखांचा निधी जाहीर केला होता. आता या निर्णयानंतर जिल्ह्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे.

Dhule Corporation
NCP News : विदर्भातील लोकसभेच्या जागांवर राष्ट्रवादी लक्ष केंद्रीत करणार; उद्या बैठकीत ठरणार...

आमदारांवर कुरघोडी

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या दुरवस्थेप्रश्‍नी शिवसेना (उबाठा) पक्षाने भीक मांगो आंदोलन करून मनपातील सत्ताधारी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर शहराचे एमआयएमचे आमदार शाह यांनी स्मारकासाठी २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता ५० लाखांची तरतूद केली आहे. तसेच इतर कुठलाही निधी न वापरण्याची सूचनाही भाजपकडून करण्यात आली आहे. या सूचनेच्या माध्यमातून आमदार शाह यांच्यावर कुरघुडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com