Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार पण...

Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेच्या चार जणांना संधी देण्याचे निश्‍चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra Cabinet Expansion :
Maharashtra Cabinet Expansion :Sarkarnama

Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भारतीय जनता पार्टीचे सहा तर शिवसेनेचे चार मंत्री शपथ घेणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.विस्तारची तारीख अद्यापही निश्‍चित झाली नसली तरी येत्या १९ जूनच्या आत विस्तार होणार असून दोन्ही पक्षाच्या मिळून दहा मंत्र्यांना मंत्रीमंडळात सामावून घेण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. परिणामी वीस जणांचा मोठा विस्तार होण्याची चर्चा आता थांबली असून त्यामुळे दोन्ही पक्षात कही खुशी, कही गम अशी स्थिती निर्माण होणार आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Cabinet Expansion :
Ajit Pawar Press : '...तर राजकारण सोडेन, असा आरोप माझ्यावर करायचा नाही'; अजितदादांनी खासदारांना सुनावले !

गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा होत आहेत. यावेळी विस्तार नक्की होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सहा तर शिवसेनेच्या चार जणांना संधी देण्याचे निश्‍चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही पक्षातील काही जुन्या नेत्यांना पक्षाला संधी द्यावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देताना प्रादेशिक व जातीय समतोल राखणे भाजपाला आवश्‍यक ठरणार आहे.

विस्तारात शिवसेनेच्या चार जणांना संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील इच्छुकांची संख्या पाहता चार जणांची नावे अंतीम करताना शिंदे यांची मोठी अडचण होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना राज्यातील महामंडळांचे वाटप केले तर मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या सहकाऱ्यांची समजून काढणे सोपे होईल, असे सांगण्यात येत आहे. काहीजण मंत्री तर काहीजणांना चांगल्या महामंडळावर संधी देत सर्वांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Cabinet Expansion :
Rajasthan Politics : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप? ; पायलट नवा पक्ष काढणार..

पुढच्या महिन्यात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्याआधी राज्यात किमान तीस जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात असेल. या विस्तारामुळे सरकारला स्थिरता येण्यास मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या एक किंवा दोन जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com