Make Jyoti Mete a minister News : भाजपने दिलेला शब्द पाळावा, डॉ. ज्योती मेटेंना मंत्रिमंडळात घ्यावे..

Beed News : चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना सरप्राईज गिफ्ट देऊ, असे जाहीर सांगीतले होते.
Make Jyoti Mete a minister News
Make Jyoti Mete a minister News Sarkarnama

Marathwada Political : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांनी कायम भाजपला साथ दिली. विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी कायम पाठराखण केली. (Make Jyoti Mete a minister News) मेटे यांना सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन कायम भाजपने दिलेले आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रभरातील पोरका झालेल्या शिवसंग्रामला डॉ. ज्योती मेटे यांचा आधार आहे. दिवंगत मेटेंना दिलेला शब्द भाजपने पाळवा, व डॉ. ज्योती मेटे यांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनी केली.

Make Jyoti Mete a minister News
Pankaja Munde Rally News : भरकटलेली दिशा अन् त्यामुळे झालेली दशा ; पंकजा मुंडे कशी बदलणार ?

विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी कायमच वंचित व उपेक्षीत घटकांना आधार देण्याचे काम केले. सर्व जाती धर्मातील गरीब, वंचित उपेक्षीत व सर्वसामान्यांचा आवाज सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय व हक्क मिळवून दिले. २०१४ पासून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दावरून भाजप (Bjp) सोबत येऊन २०१४ साली विधानसभेच्या निवडणुकीत वर्सोवा मतदार संघात डॉ. भारती लव्हेकरांच्या रूपाने शिवसंग्रामचा झेंडा मुंबईत फडकवला.

त्याचप्रमाणे २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किनवटमध्ये भीमराव केराम आणि पुन्हा वर्सोवामध्ये डॉ. भारती लव्हेकर हे दोन आमदार झाले. २०१४ साली भाजपासोबत असलेल्या रिपाइं, स्वाभीमानी, रासप या तीनही मित्रपक्षांना मंत्रीपदे मिळाली. मात्र, शिवसंग्राम मंत्रीपदापासून उपेक्षीत राहीले. विनायक मेटे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यातील मैत्रीमुळे कोणीही चकार शब्द काढला नाही.

परंतु पुन्हा एक आशेची किरण उमटली आणि आमदार विनायक मेटे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही दिवसांनीच मेटे यांच्या मुंबईत झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना सरप्राईज गिफ्ट देऊ, असे जाहीर सांगीतले. त्यामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले.

परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते व या सर्व महाराष्ट्रातील शिवसंग्रामच्या जनतेचे स्वप्न पुन्हा स्वप्नच राहिले. परंतु आज जरी आम्ही आमचे दैवत गमावले असले तरी आम्ही त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव कार्यरत असू, असे अनिल घुमरे यांनी पत्रकात म्हटले आहे. परंतु यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामसाठी एक पाऊल पुढे येत डॉ. ज्योती मेटे यांना विधान परिषदेवरती घेऊन मंत्री पद द्यावे, अशी मागणी पत्रकात करण्यात आली.

Make Jyoti Mete a minister News
पंकजा मुंडेंचा करिष्मा अजूनही कायम ! | Pankaja Munde | BJP | Gopinath Gad | Sarkarnama | #shorts

डॉ. ज्योती मेटे ह्या उच्चशिक्षित आहेतच त्याचबरोबर त्यांना शासकीय कामकाजाचा अनुभव देखील असून त्या स्वतः डॉक्टरही आहेत. ज्योतीताई यांना शिवसंग्रामच्या पुणे येथील पदाधिकारी बैठकीमध्ये शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील घोषित करण्यात आले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये मध्यंतरी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रात तसेच बीडमध्ये चांगले यश प्राप्त झाले आहे.

म्हणुन भाजप पक्षाने आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा विचार करावा व डॉ. ज्योती मेटे यांना सरकारमध्ये सामावून घ्यावे. हिच खरी दिवंगत विनायक मेटे साहेबांना आदरांजली असेल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com