Sharad Pawar in Solapur: शरद पवार पुन्हा पावसात: सोलापुरात नक्की काय घडलं?

Solapur News| त्यांच्या या सभेची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात चर्चा झाली.
Sharad Pawar in Solapur:
Sharad Pawar in Solapur:Sarkarnama

Sharad Pawar in Solapur: 2019 च्या निवडणुकीदरम्यान साताऱ्यात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) भाषण देत होते. त्याचवेळी पावसाने हजेरी लावली, पण भर पावसात शरद पवार यांनी आपले भाषण पूर्ण केले.त्यांच्या सभेची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात चर्चा झाली. या सभेचे अनेक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. (Sharad Pawar again in the rain: What exactly happened in Solapur)

या घटनेनंतर राज्यातील ऐतिहासिक सत्तांतर संपूर्ण देशाने पाहिले. पाऊस आणि शरद पवार असं एक समीकरणचं बनलं. अशातच या घटनेचा अनुभव त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आला आहे. शरद पवार काल सोलापूर (Solapur news) दौऱ्यावर होते. दिवसभराच्या सभा आटोपल्यानंतर सहकाऱ्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचं त्यांचं नियोजन होतं.

Sharad Pawar in Solapur:
CM Eknath Shinde News : शेतीप्रश्नांवर मुख्यमंत्री इन अॅक्शन मोड; शेतकरी संघटनांच्या नेत्यांची घेणार बैठक !

त्याचं काय झालं, सोलापूर शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा होता. सभा आटोपल्यानंतर ते विवाहाच्या ठिकाणी निघाले पण अचानक पाऊस आला. पण शरद पवार यांनी शब्द दिला आणि तो पाळला नाही असं कधीच झालं नाही. पवारांनी आपला शब्द पाळला आणि भर पावसात विवाहास्थळी रवाना झाले. (Maharashtra Politics)

पंढरपूर, सांगोला दौरा आटोपून ते सोलापुरात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. आपले कार्यकर्ते पावसात उभे असल्याचे पाहताच त्यांनीही आपले वाहन थांबवून पावसात भिजतच त्यांचे आभार व्यक्त केले. पवार यांनी नव वधू आणि वराला शुभ आशीर्वाद दिले. लग्न सोहळ्या दरम्यान अचानक पाऊस आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली होती.पण भर पावसातही शरद पवारांनी लग्नाला (Marriage) हजेरी लावली. विवाह स्थळी दाखल होताच त्यांना पाहून कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com