Solapur politics : माढ्यात कुस्तीस्पर्धेत राजकारण तापलं : मोहिते-पाटील अन् खासदार, आमदारांमधील मतभेद चव्हाट्यावर

Ranjitsinh Naik-Nimbalkar News : माढा लोकसभा मतदारसंघात राजकारणाला धार आली आहे.
Ranjitsinh Naik-Nimbalkar, Vijaysinh Mohite-Patil, Ram Satpute
Ranjitsinh Naik-Nimbalkar, Vijaysinh Mohite-Patil, Ram SatputeSarkarnama

Madha LokSabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघात राजकारणाला धार आली आहे. खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik-Nimbalkar) आणि स्थानिक आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेला निमंत्रण देण्यात आले नाही. माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू झाल्यानंतर रविवारी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमाला आमदार राम सातपुते यांना निमंत्रण देण्यात आले. मात्र, हा विषय केवळ आजच्या कार्यक्रमापुरता नाही. खासदार-आमदार व मोहिते-पाटील यांच्यातील शितयुद्ध गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

आमदार-खासदार मतदारसंघातील काही कार्यक्रम परस्पर घेतात. त्या कार्यक्रमांना मोहिते-पाटील परिवारातील कुणालाही बोलविण्यात येत नाही. निधी वाटपातदेखील मोहिते-पाटील यांना विश्‍वासात घेतले जात नाही, असा आरोप मोहिते-पाटील यांच्यावतीने करण्यात येतो. अर्थात हे बोलण्यासाठीदेखील मोहिते-पाटलांकडून अधिकृतपणे कुणीही पुढे येत नाही. त्यांच्यावतीने त्यांचे काही निकटवर्तीय ही भूमिका मांडत आहेत.

Ranjitsinh Naik-Nimbalkar, Vijaysinh Mohite-Patil, Ram Satpute
Uddhav Thackeray News : ठाकरेंनी वाढवले शिंदे गटातील आमदारांचे टेन्शन; पुढील काळात आणखी प्रवेश अन् सभा होणार...

खासदार-आमदारांना उद्घाटन कार्यक्रमला न बोलविता फलटणचे संजीवराचे नाईक-निंबाळकर यांना निमंत्रण देणे. त्याच कार्यक्रमाला रामराजे निंबाळकरांनी उपस्थित राहणे, यातून खासदार निंबाळकरांना इशारा देण्यात येत असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. २०२४ चा माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा सुरू असताना भारतीय जनता पार्टीतील शितयुद्ध भाजपाला (BJP) महागात पडू शकते. राष्ट्रवादी (Ncp) या मतदारसंघात एका चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे. या पाश्‍र्वभूमीवर भाजपातील शितयुद्ध पक्षाला अडचणीत आणू शकते.

आता माढा लोकसभा मतदारसंघांचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील परिवारात दरी वाढताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेलां सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. मोहिते-पाटील आणि त्यांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमधील मतभेद टोकाला गेल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.

Ranjitsinh Naik-Nimbalkar, Vijaysinh Mohite-Patil, Ram Satpute
Sharad Pawar Stand About Barsu : 'बारसूच्या लोकांना विश्वासात घ्यायला हवे, तेथील लोकांना भेटण्याची इच्छा,' ; शरद पवारांंची भूमिका!

संजीवबाबा निंबाळकर यांचे नाव माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून घेतले जाते. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या मनात नक्की काय चालले आहे, याबाबत राजकीय वर्तुळत अनेक चर्चा सुरु असतात. त्यामुळे माढ्यामध्ये भाकरी फिरवणार का? अशी चर्चा होत आहे. मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला असणारा माढा लोकसभा मतदारसंघ विजयसिंह मोहिते-पाटील खासदार असताना रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सोडण्यात आला. व रणजीतसिंह नाईक-निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या विजयामध्ये मोहिते-पाटील परिवाराचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.

भाजपमध्ये आल्यापासून मोहिते-पाटलांना त्यांच्या तोलांमोलाचे पद मिळाले नाही. शिवाय अनेक कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते-पाटीलंशिवाय केल्याचा आरोप होतो. त्यातच रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळावी, अशी मागणी सोशल मीडियावर कार्यकर्ते करताना दिसतात. त्यामुळे मोहिते-पाटलांच्या मनात नक्की काय चालले आहे. मोहिते-पाटलांचे हे धक्कातंत्र कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in