Rajaram Sugar Factory Election: राजाराम साखर कारखाना निवडणूक: महाडिकांची ताकद पणाला, सतेज पाटलांनीही ठोकले शड्डू

Kolhapur Politics| राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Rajaram Sugar Factory Election:
Rajaram Sugar Factory Election:

Rajaram Sugar Factory Election कोल्हापूरच्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. सात तालुक्यातील ५८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (२५ एप्रिल) मतमोजणी होणार आहे. (Rajaram Sugar Factory Election: Mahadika's strength is at stake, Satej Patil will coup?)

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये करवीर (कोल्हापूर शहर) आणि संस्था गटातील मतदान प्रक्रिया सुरु आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सतेज पाटील यांच्या बावड्यात तर महादेवराव महाडिकांच्या शिरोली पुलाचीमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Kolhapur News)

Rajaram Sugar Factory Election:
Maharashtra Politics: राजा तणावात राहणार..; भेंडवळच्या घटमांडणीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य

या मतदान केंद्रांवर 129 मतदार आहे. यांपैकी 46 मतदारांनी मतदान केलं. तर वंदूर येथील मतदान केंद्रावर एकूण 105 मतदार आहेत. पण यातील मृत सभासदांची संख्याही जास्तच आहे. वंदूर येथे 89, लिंगनूर दुमालात पाच, आणि करनूर येथे पाच अशी मतदारांची संख्या आहे.

या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी,"महाडिकांसाठी ही निवडणूक नेहमीच सोपी असते. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. माझं कसं असतं धर की पकड आणि स्वारी घाल ते लगेच चिटपट कर. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला. (

Rajaram Sugar Factory Election:
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तेचं सिंहासन डळमळत राहणार; बाळुमामांच्या यात्रेत मोठं भाकित

तर खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, महादेवराव महाडिक हे जिल्ह्याचे जादूगार आहेत त्यामुळे निकाल सांगण्याची गरज नाही. राजाराम कारखान्याची निवडणूक आम्ही जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. (Rajaram sugar Factory election)

गेल्या 28 वर्षांपासून राजाराम कारखान्यावर महाडिकांची सत्ता आहे. सत्तांतरासाठी सतेज पाटील गटानेही आपली ताकद पणाला लावली आहे. तर महाडिकांनी सुद्धा सत्ता राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माने गटाने जोरदार प्रचार केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com