Rajaram Sugar Factory Elelction:
Rajaram Sugar Factory Elelction:Sarkarnama

Rajaram Sugar Factory Election: ही लढाई सभासद आणि विरुद्ध हुकूमशाहीची; सतेज पाटलांनी फुंकले रणशिंग

Rajaram Sugar Factory Election | राजाराम कारखाना कोल्हापूरच्या सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे.

Rajaram Sugar Factory Election: गेल्या 28 वर्षांपासून छत्रपती राजाराम कारखान्यात महाडिकांची सत्ता आहे. कोल्हापूरातील सभासद आणि विरुद्ध हुकूमशाही अशी ही लढाई आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा, त्यासाठी पाच वर्षे आमच्या ताब्यात सत्ता द्यावी, अशी आमची इच्छा आहे. असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे. (This is a battle of members and against dictatorship; Satej Patil blew the trumpet)

सोमवारी (२७ मार्च) पाटील यांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपल्या श्री राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले. याच वेळी त्यांनी आमचं ठरलंय, कंडका पाडायचा’ यंदा परिवर्तन झालचं पाहिजे,अशा जोरदार घोषणा दिल्या.

Rajaram Sugar Factory Elelction:
Eknath Khadse News : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार; गिरीश महाजनांनी दिले 'हे' संकेत

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, हा राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा विषय आहे, त्यामुळे प्रचारात आम्ही जे मुद्दे मांडले त्यावर सत्ताधार्‍यांनी खुलासा द्यावा, असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांचा ऊस दर दोनशे रुपये जास्त असताना राजाराम कारखान्याचा ऊस दर दोनशे रुपयांनी कमी देण्याचं पाप या लोकांनी केलं. कोजन नाही, इथेनॉल प्रकल्प नाही. गेल्या निवडणुकीत बाहेरच्या सभासदांनी सत्ताधाऱ्यांकडे कारखाना दिला. पण, सभासदांना अपेक्षित दर मिळालेला नाही किंवा कारखान्याची प्रगती झाली नाही.

Rajaram Sugar Factory Elelction:
Solapur News : 'बाजार समितीत' भाजप गट मोठा करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन लढणार; आमदार अवताडेंनी कसली कंबर

आताची निवडणूक पाटील विरूद्ध महाडिक अशी नाही, तर कोल्हापुरातील बारा हजार सभासद विरूद्ध सत्ताधाऱ्यांनी बाहेरच्या ६०० सभासद अशी आहे. आता हा कारखाना कोणाच्या ताब्यात द्यायचा, हे कोल्हापूरचे १२ हजार सभासद सभासद ठरवतील. बाहेरच्या सभसदांनी चुकीच्या लोकांकडे कारखाना दिला, पण याचा पश्‍चाताप याचा मूळ सभासदांना होत आहे.

राजाराम कारखाना कोल्हापूरच्या सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे.इतर कारखाने तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये अशा दराने देत असताना राजाराम कारखाना मात्र प्रतिटन उसाला दोन हजार ८४० ते दोन हजार ९०० रुपये दर देत आहे.हिच वाढीव रक्कम राजाराम कारखान्याच्या सभासदांना मिळाली पाहिजे, असा आमचा मानस असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com