Protest Of Disabled In Satara: पालकमंत्र्यांच्या घरासमोर दिव्यांगांचे आंदोलन; आत्मदहनाचा इशारा अन्‌ पोलिसांची जबरदस्ती

Shambhuraj Desai: अपंगांना त्रास होत आहे, आम्हाला कोणत्याही सुविधा शासकिय कार्यालयात मिळत नाही. पालकमंत्री केवळ आश्वासने देत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
Movement of the disabled in Satara
Movement of the disabled in SataraPramod Ingale, Satara

Satara News : आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा… अशी घोषणाबाजी करत जिल्ह्यातील दिव्यांगांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोरच अर्ध नग्न आंदोलन केले. याप्रकारामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या सभासदांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सध्या शासन आपल्या दारी योजना राबवण्यात येत आहे. पण, या याोजनेत दिव्यांगांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष हाोत आहे. दोन महिने झाले तरी दिव्यांग व्यक्तींना तहसील कार्यालयात Satara Tahashil Office डॉक्युमेंट दिली जात नाहीत. त्यांची आडवणूक केली जात आहे. सातारा तहसिल कार्यालयाकडे 20 दिव्यांग बांधवांचे डॉक्युमेंट आहेत. पण उत्पन्नाचे दाखले दिले जात नाहीत.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होऊन प्रत्येक वर्षी डॉक्युमेंटची गरज नाही असे सांगण्यात आले होते. मात्र, याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने वेळोवेळी निवेदने दिली. पालकमंत्र्यांनी दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक घेतलेली नाही. हा दिव्यांगावर अन्याय आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला हाोता.

Movement of the disabled in Satara
Satara News : 'केसीआर'चे उदयनराजेंपुढे आव्हान; तेलंगणा विकास पॅटर्न साताऱ्यात

त्यांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष होत असल्याने या दिव्यांग व्यक्तींनी आज एसपींना भेटून न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पण, मुख्यालयात एसपी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे सर्व दिव्यांग बांधव पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी आले. तेथे भर उन्हातच पालकमंत्र्यांच्या दारासमोर ठिय्या मारला. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खूर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजीही या दिव्यांग बांधवांनी केली.

Movement of the disabled in Satara
Shivsena Vs BJP : शिवसेनेला गृहीत धरू नका; धाराशिवच्या जागेवरून सावतांचा भाजपला इशारा

एका आंदोलकाने इंधन असलेली बाटलीच आत्मदहनाच्या उद्देशाने आणली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने संबंधितांकडून इंधन असलेली बाटली ताब्यात घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. यानंतर पोलिसांनी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण, एसपींच्या कानावर ही बाब गेल्यामुळे त्यांनी सर्व दिव्यांग बांधवांना चर्चेसाठी बोलावले.त्यामुळे आंदोलक पोलिस मुख्यालयात चर्चेसाठी गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com