Collector Order News : सरकारी जमीनीवर अतिक्रमण ; दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र..

Marathwada : ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) ज-३ व १६ नुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून चालू राहण्यास तात्काळ प्रभावाने अपात्र ठरविण्याचा आदेश पारीत केला.
Collector Order News
Collector Order NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : सरकारी जमीनीवर अतिक्रमन केल्याच्या कारणावरून, तपोवन (ता. कन्नड) ग्रामपंचायतीचे सदस्य पुंडलिक रावण गायकवाड, वंदना रामहरी सोनवणे यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) अपात्र घोषित केले आहे. तपोवन (ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२१ मध्ये झालेली आहे.

Collector Order News
Ashok Chavan On Karnataka Result : `भारत जोडो` यात्रेचा इम्पॅक्ट कर्नाटक निवडणुकीत दिसला..

सदरील निवडणुकीत पुंडलिक रावण गायकवाड, वंदना रामहरी सोनवणे हे सदस्य म्हणून निवडून आले. दरम्यान (Kannad) तपोवन येथील मतदार व रहिवाशी वामन गवणाबा नागरे यांनी दोघांच्याही निवडीला जिल्हाधिकाऱ्यांकडे ॲड. चंद्रकांत विनायक बोडखे यांच्या मार्फत आव्हान दिले. (Aurangabad) ग्रामपंचायत सदस्य रावण गायकवाड, वंदना सोनवणे यांनी तपोवन येथील गट नं. ३२ सरकारी क्षेत्रावर अतिक्रमण केलेले आहे.

त्यामुळे त्यांना अपात्र करण्याची विनंती केली. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने तहसिलदारांनी चौकशी करुन अहवाल पुंडलिक गायकवाड आणि वंदना रामहरी यांनी सरकारी जमीनीवर अतिक्रमण केल्याचा अहवाल सादर केला. (Marathwada) त्यानंतर सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी मुळ तक्रारदार वामन नागरे यांचा विवाद अर्ज मंजूर करुन दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करुन, पद रिक्त घोषित केले.

तक्रारदारांतर्फे ॲड. चंद्रकांत विनायक बोडखे यांनी काम पाहिले. जिल्हाधिकारी यांनी निकालात दोन्ही सदस्यांनी व त्यांच्या कुटूंबीयांनी अतिक्रमण केले असून, असे निष्कर्ष नोंदविले की, सदरील प्रकरणात जनाबाई विरुद्ध अप्पर आयुक्त या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या न्यायतत्व विचारात घेता, गैरअर्जदार व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी सरकारी गायराव जमीन गट नं. ३२ वर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट होते.

तसेच ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक रावण गायकवाड, वंदना रामहरी सोनवणे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) ज-३ व १६ नुसार ग्रामपंचायत तपोवन (ता. कन्नड) चे सदस्य म्हणून चालू राहण्यास तात्काळ प्रभावाने अपात्र ठरविण्याचा आदेश पारीत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com