MIDC News : एमआयडीसी क्षेत्रातील गुंडगिरी रोखा : उदय सामंतांची अधिकाऱ्यांना सूचना

Narendra Patil कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना सादर केले होते.
Minister Uday Samants Meeting
Minister Uday Samants Meetingsarkarnama

-राजेश पाटील

Uday Samant News : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) MIDC क्षेत्रातील नोंदीत कष्टकरी माथाडी कामगार व उद्योजकांना गुंडगिरीचा होणारा त्रास थांबविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी उद्योग व कामगार विभागाच्या संबंधितांना दिल्या.

एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांकडून माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्हावी.विविध माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगारांना हक्काचे काम मिळावे. कामाची लेव्हीसह मजूरी माथाडी बोर्डात भरणा करावी आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना सादर केले होते.

त्याची तातडीने दखल घेवून मुंबईत माथाडी संघटनेच्या मागणीनुसार वरिष्ठ आधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन मंत्री सामंत यांनी सूचना केली. एमआयडीसीतील उद्योगांना आणि कष्टकरी नोंदीत माथाडी कामगारांना बोगस माथाडीकडून होणारा त्रास थांबविण्यासाठी कामगार मंत्री, कामगार व उद्योग विभागाचे अधिकारी, उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यांची उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्याचे नियोजन करण्याचे आश्वासनही उद्योग मंत्र्यांनी दिले.

Minister Uday Samants Meeting
Narendra Patil News : दंड थोपटत नरेंद्र पाटलांनी आपल्याच सरकारला नमवलं!

माथाडी नेते नरेंद्र पाटील, पोपटराव देशमुख,कृष्णा पाटील, सुनिल यादव,डॉ. विपीन शर्मा, लोखंडे, दादासाहेब खताळ, किरण जाधव, ए एस खरात,राजेश आडे, सुनिता म्हैसकर, बाळासाहेब वाघ, संदेश आयरे, सुर्यकांत डोबरियाल आदी आधिकरी,पदाधिकारी यांनी चर्चेत सहभाग घेतला. एमआयडीसी क्षेत्रात स्थानिक गुंड व बोगस माथाडीकडून उद्योजक व नोंदीत माथाडी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबतची सविस्तर माहिती नरेंद्र पाटील यांनी बैठकीत दिली.

Minister Uday Samants Meeting
Satara News : शिंदेंची शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट; ४० आमदारांसह वजीर गायब होणार...

एमआयडीसी क्षेत्रात माथाडी कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही, बोगस माथाडी व कांही तथाकथीत कामगार नेते हे उद्योजक व नोंदीत माथाडी कामगारांना त्रास देत आहेत असेही त्यांनी सांगितले. हा त्रास थांबविण्यासह उद्योग वाढ व शासनाच्या माथाडी कायद्यान्वये नोंदीत असलेल्या माथाडी कामगारांनाच कामे मिळण्याबद्दलची कार्यवाही उद्योग व कामगार विभागाने काटेकोरपणे करण्याच्या सूचना मंत्र्यानी केल्याबद्दल नरेंद्र पाटील यांनी उद्योगमंत्र्यांचे आभार मानले.

Minister Uday Samants Meeting
Patan APMC Result : पाटणकरांना धक्का; पालकमंत्र्याच्या पॅनेलने ग्रामपंचायतीच्या चारही जागा जिंकल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com