MIDC : माणदेशातील कॉरिडॉरसाठी देवेंद्र फडणवीसांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय....

कॉरिडॉरसाठी corridor जमीनच उपलब्ध होत नसल्याची Land not available कारणे तत्कालिन राज्य सरकार State Government केंद्रास central goverment सांगत होते.
Tanaji Sawant, Devendra Fadanvis
Tanaji Sawant, Devendra Fadanvissarkarnama

म्हसवड : माण देशातील म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव, गारवड येथीलच जागेतच बेंगलोर -मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ( बीएमआयसी ) स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारला राज्य सरकारकडून कळविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे माणदेशातून स्वागत होत आहे.

माळशिरस तालुक्यातील अॅड. सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे, अजित बोरकर, शिवराज पुकळे, सोमनाथ पिसे, अमोल यादव, साहिल आतार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना भेटून सातारा, सांगली व सोलापुर या तीन जिल्ह्याच्या दुष्काळी पट्टयातील माणदेशातील म्हसवड, मासाळवाडी व धुळदेव व त्या लगतच्याच माळशिरस तालुक्यातील गारवड येथे राज्य सरकारच्या सहभागाने केंद्र सरकारने बेंगलोर-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर स्थापन करण्याची निर्णय घेऊन जागा निश्चित केली होती.

त्यानंतर जमीन संपादनाची कार्यवाही अंतिम टप्यात पूर्णत्वास आली असताना राज्यात सत्तांतर होताच अचानकपणे राज्य सरकारकडून कार्यवाही थांबविण्यात आली आहे.या नियोजित कॉरिडॉरसाठी जमीन उपलब्ध बाबतची समस्या नसुन गारवड येथील संबंधित जमीन मालकांनी सुमारे साडेचार हजार एकर जमीन स्वखुशीने सरकारला देण्याबाबतचे लेखी संमत्ती पत्र दिले असताना या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधून गारवड वगळण्यात आले.

Tanaji Sawant, Devendra Fadanvis
Maan : म्हसवड-पंढरपूर महामार्गाचे निकृष्ट काम; आमदार गोरेंची थेट गडकरींकडे तक्रार

या गावाचा पुन्हा त्यामध्ये समावेश करावा. तसेच म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव गावाच्या परिसरातील नापिक पडीक अशी सुमारे साडे आठहजार एकर जमीन उपलब्ध आहे. अशी वस्तुस्थिती असताना या कॉरिडॉरसाठी जमिनच उपलब्ध होत नसल्याची कारणे तत्कालिन राज्य सरकार केंद्रास सांगत होते. केंद्र सरकारला अकल्पित चुकीची माहिती दिली गेली. यामुळे माण देशातील दुष्काळ पिढीत जनतेत कमालीचा नाराजीचा सुर असल्याची माहिती दिली.

Tanaji Sawant, Devendra Fadanvis
Shivsena : मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल, एमआयडीसी भूखंड स्थगिती बाबतचा निर्णय जैसे थे..

या गावाचा पुन्हा त्यामध्ये समावेश करावा. तसेच म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव गावाच्या परिसरातील नापिक पडीक अशी सुमारे साडे आठहजार एकर जमीन उपलब्ध आहे. अशी वस्तुस्थिती असताना या कॉरिडॉरसाठी जमिनच उपलब्ध होत नसल्याची कारणे तत्कालिन राज्य सरकार केंद्रास सांगत होते. केंद्र सरकारला अकल्पित चुकीची माहिती दिली गेली. यामुळे माण देशातील दुष्काळ पिढीत जनतेत कमालीचा नाराजीचा सुर असल्याची माहिती दिली.

Tanaji Sawant, Devendra Fadanvis
Maan : कॉरिडॉर एमआयडीसी म्हसवडमध्येच होणार... जयकुमार गोरे

त्यानंतर प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी स्वत: पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीस हे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे आले असता त्यांची भेट घेतली. त्यांना म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव व गारवड येथील नियोजित बेंगलोर - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर संबंधित निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. निवेदन पाहून श्री. फडणविस यांनी हा नियोजित इंडस्ट्रीयल कॉरिडॉर दुष्काळी भागातच होईल याबाबत मुंबईत माहिती घेऊन येथीलच जमीन निश्चित बाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्याची ग्वाही त्यांनी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना दिली.

Tanaji Sawant, Devendra Fadanvis
सोलापूरच्या दोन देशमुखांवर तानाजी सावंत भारी; पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी

आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना भेटून दुष्काळी भागातील माण व माळशिरस तालुक्यात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर स्थापन करण्याबाबत निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच दुष्काळी भागातील जनतेला न्याय देण्याबाबत योगदान दिल्याबद्दल अॅड. सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे,अजित बोरकर,शिवराज पुकळे सोमनाथ पिसे,अमोल यादव, साहिल आतार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Tanaji Sawant, Devendra Fadanvis
Raj Thackeray : मी, फडणवीस, सीएम एकत्र बघून लोकांना वाटेल एकावर एक फ्री आहे का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com