सतेज पाटील-चंद्रकांतदादांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पोटनिवडणुकीत ६१ टक्के मतदान

महापालिकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे बघितले जाते. त्यामुळेच मतदानात दोन्ही बाजूंनी प्रचंड ईर्ष्या, चुरस पाहायला मिळाली.
Kolhapur North Election
Kolhapur North ElectionSarkarnama

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या कोल्हापूर (kolhapur) उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (byelection) आज (ता. १२ एप्रिल) चुरशीने ६१ टक्के मतदान झाले. मागच्या निवडणुकीत ५८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात विजयाचे दान टाकते, हेही पाहणे महत्वाचे आहे.किरकोळ वादाचे प्रसंग सोडले तर शांततेत मतदान झाले. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यासाठी आत्मसन्माची लढाई असलेल्या या पोटनिवडणुकीची मतमोजणी येत्या शनिवारी (ता. १६ एप्रिल) सकाळी आठपासून होणार आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. निवडणुकीच्या रिंगणात १५ उमेदवार असेल तरी खरी लढत काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यातच झाली. मतदारसंघात २ लाख ९१ हजार ५३९ मतदार आहेत. ३५७ केंद्रांवर मतदान झाले. मतदारसंघात महापालिकेचे ५३ प्रभाग येतात. महापालिकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे बघितले जाते. त्यामुळेच मतदानात दोन्ही बाजूंनी प्रचंड ईर्ष्या, चुरस पाहायला मिळाली.

Kolhapur North Election
जयंत पाटलांनी वाढवले आमदार रविशेठ पाटील अन्‌ शेकापचे टेन्शन...

काँग्रेस व भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे राज्य पातळीवरील नेत्यांच्या प्रचाराने मतदारसंघात रान उठवले होते. भाजपकडून विधानसभा, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह पक्षाचे राज्याच्या विविध भागातील आमदार मैदानात उतरले होते. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह डझनभर मंत्र्यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हर्च्युअल सभेने महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता झाली.

Kolhapur North Election
रमजान ईदपर्यंत मस्जिदींवरील भोंगे उतरवा : राज ठाकरेंची सरकारला नवी डेडलाईन

भाजपच्या बूथवर भगवे कापड लावण्यावरून झालेली वादावादी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवेळी झालेल्या घोषणाबाजीमुळे निर्माण झालेला तणाव वगळता मतदान शांततेत झाले. मतदानाच्या प्रक्रियेत राखीवसह २३९२ कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. पैकी २५० कर्मचारी राखीव होते. मतदानासाठी ३५७ यंत्रे वापरण्यात आली तर ११५ यंत्रे राखीव ठेवली होती. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे घरात जाऊन मतदान नोंदवण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग या निवडणुकीत करण्यात आला. त्यालाही प्रतिसाद चांगला मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com