Ganesh Sugar Factory : गणेश कारखान्याच्या निवडणुकीत रंगत; 'कपबशी, छत्री अन् शेतकरी' मैदानात

Ahmednagar News : प्रचारात विखे गटाची आघाडी, आज-उद्या शेतकरी संघटना, थोरात-कोल्हे गटाचा शुभारंभ
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Shehlata Kolhe, Ajit Kale
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Shehlata Kolhe, Ajit KaleSarkarnama

Vikhe vs Thorat-Kolhe : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एकत्र येत गणेश कारखान्याच्या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना आव्हान दिले आहे. तसेच शेतकरी संघटनेनेही आपले नऊ उमेदवार उतरवल्याने कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे.

या निवडणुकीत विखे गटाला कपबशी, थोरात-कोल्हे गटाला छत्री तर शेतकरी संघटनेला हातात ऊस घेतलेला शेतकरी अशी चिन्हे मिळालेली आहेत. चिन्ह वाटपानंतर आता प्रचाराची राळ उडणार आहे. (Latest Marathi News)

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Shehlata Kolhe, Ajit Kale
Threat to kill Thackeray's Leader : शिंदे गटाच्या नेत्याकडून ठाकरेंच्या प्रवक्त्यांना जीवे मारण्याची धमकी; 'तुला तुझ्या कुटुंबासह...'

चिन्ह मिळाल्यानतंर गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ धडाक्यात करण्यात आला. विखे गटाने बुधवारी (ता. ७)राहता येथील वीरभद्र मंदिरात उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडला. विखेंनी (Radhakrishna Vikhe Patil) या निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. तर गुरुवारी (ता. ८) शेतकरी संघटना प्रचाराला सुरूवात करणार आहे.

शेतकरी संघटना आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला वाकडी येथील खंडोबा मंदिरातून सुरूवात करणार आहे. यानंतर याच मंदिरात (Balasaheb Thorat) थोरात-कोल्हे गट शुक्रवारी (ता. ९) आपल्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

उत्तर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राजकारण विखे, थोरात आणि कोल्हे यांच्या भोवती फिरताना दिसते. गणेश निवडणुकीत थोरातांना भाजपच्या कोल्हेंनी साथ दिली आहे. तर राधाकृष्ण विखे गट स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरलेला आहे. शेतकरी संघटनेचे (Swabhimani) अॅड. विजय काळे यांनीही आपले नऊ उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. यामुळे गणेश कारखान्याची ही निवडणूक रंगतदार होणार आहे. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. (Ganesh Sugar Factory)

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Shehlata Kolhe, Ajit Kale
Sushma Andhare News : शिरसाटांना न्यायालयाचा दणका; अंधारे अब्रुनुकसान प्रकरणी दिले 'हे' आदेश

उमेदवारी माघारीनंतर या निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. यात मुख्य लढत होणारे थोरात-कोल्हे गटाचे १९, विखे गटाचे १९ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ९ उमेदवार रिंगणात आहेत.

विखे गटाचे उमेदवार

बाबासाहेब डांगे, बाबासाहेब मते , उत्तम डांगे, अनिल सदाफळ, पुंजाजी गमे, शिवनाथ घोरपडे, संजय नळे, जालिंदर मुरादे, विशाल गोरे, राजेंद्र लहारे, संपत शेळके, दत्तात्रय धनवटे, बाळासाहेब गाढवे, अनिताबाई कोते, गयाबाई भवर, प्रकाश पुंड, प्रदीप बनसोडे, संजय भाकरे, ज्ञानदेव चोळके.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Shehlata Kolhe, Ajit Kale
Uddhav Thackeray Bihar tour : नितीशकुमारांच्या मातोश्री भेटीनंतर उद्धव ठाकरे बिहारच्या राजधानीत; विरोधक एकत्र येणार?

थोरात-कोल्हे गटाचे उमेदवार

बाबासाहेब डांगे, विजय दंडवते, गंगाधर डांगे, नारायणराव कार्ले, संपत हिंगे, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, अरुंधती फोपसे, सुधीर लहारे, विष्णुपंत शेळके, संपत चौधरी, अनिल गाढवे, कमलाबाई धनवटे, शोभाबाई गोंदकर, अनिल टिळेकर, अलेश कापसे, मधुकर सातव, सुधाकर जाधव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार

भाऊसाहेब शिंदे, सतीश मोरे, बापु धनवटे, नानासाहेब गाढवे, लक्ष्मीबाई गाढवे, वैशाली क्षीरसागर, नारायण भुजबळ, भगवंता मासाळ, आण्णासाहेब सातव.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com