Aatpadi Bazar Samiti: आटपाडी बाजार समितीत भाजपला धक्का; शिंदे गटाने डाव पालटला...

Aatpadi APMC News: आटपाडी बाजार समितीच्या स्थापनेपासूनच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले होते.
Aatpadi Bazar Samiti:
Aatpadi Bazar Samiti:Sakarnama

Atpadi Bazar Samiti News: आटपाडी बाजार समितीच्या (Atpadi Bazar Samiti Election) सभापती पदी शिंदे गटाचे संतोष पुजारी आणि उपसभापती पदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची १० विरुद्ध ८ मतांच्या फरकाने निवड झाली. (BJP shocked in Atpadi Bazar Committee; The Shinde group changed tack)

Aatpadi Bazar Samiti:
Sanjay Raut News : लोकसभेसाठी आघाडीच्या १६ - १६- १६ फॉर्म्युल्याची चर्चा ? पण संजय राऊत म्हणतात,''ठाकरे गट...''

नुकत्याच झालेल्या बाजर समित्यांच्या निवडणुकीत आटपाडी बाजार समितीवर शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस आणि रासप यांच्या आघाडीने ९, आणि भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत ९ अशा सम-समान जागा मिळाल्या. त्यानंतर झालेल्या गुप्त मतदानात शिंदे गटाने बाजी मारली. आटपाडी बाजार समितीच्या स्थापनेपासूनच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले होते. (Atpadi Bazar samiti)

राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर विरोधक मानले जाणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी हातमिळवणी केल्याने आटपाडी बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान ९ जागा मिळाल्याने बाजार समितीवर कोणाची सत्ता येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. निकालानंतर सत्ताधारी गटाने त्याच दिवशी विजयी झालल्य उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवले होते.सर्वांचे फोनही बंद होते. तर विरोधी गटाचे सदस्यही बाहेर ठेवले होते.

Aatpadi Bazar Samiti:
Jayant Patil : "नार्वेकर आमचे जावई.. ते तसं करणार नाहीत ' ; जयंत पाटील असं का म्हणाले..

आज सकाळीच तहसील कार्यालयाच्या सभागृहात बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची नियुक्ती प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी भाजप आघाडीने सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंत देशमुख आणि उपसभापतिपदासाठी दादासाहेब हुबाले यांनी अर्ज दाखल केले. तर शिवसेना आघाडीकडून सभापतिपदासाठी संतोष पुजारी आणि उपसभापतिपदासाठी राहुल गायकवाड यांनी उमेदवारी दाखल केली. (Political Breaking News)

दोन्ही गटांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले होते. दुपारी दोन वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी गुप्त मतदान प्रक्रिया घेतली. मतमोजणीनंतर सेनेच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या उमेदवारांना १० मते पडली, तर भाजप आघाडीच्या उमेदवारांना ८ मते पडली. निकाल जाहीर केल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. (Political Short Videos)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com