Sadabhau Khot News: आरटीओ अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला ठोठावला ३० हजारांचा दंड; मग सदाभाऊ खोतांनी जे काही केलं ते...

Maharashtra Politics: आधीच अवकाळी पावसानं कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्याची अशी आडकाठी पाहून सदाभाऊ खोतांचा संताप अनावर...
Sadabhau Khot News
Sadabhau Khot NewsSarkarnama

Sangli News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील शिवाजीराव यादवराव वने या शेतकऱ्याची हळद घेऊन जाणारी गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील सावळी येथे आज अडवली. आरटीओ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला ३० हजार रुपये दंड ठोठावला. यानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत चांगलेच संतापले आणि त्यांनी त्यानंतर जे काही केलं तो परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

सांगली जिल्ह्यातील सावळी येथे शेतकऱ्याची हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आणि इन्शुरन्स संपलाय म्हणून अडवली. त्यानंतर आरटीओ आरटीओ अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला 30 हजार रुपये दंड केला. याची माहिती मिळताच शेतकरी नेते सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) तिथे आले. त्यांनी आरटीओ कार्यालयातच हल्लाबोल करत आंदोलन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Sadabhau Khot News
Threat to Anna Hazare : 'राळेगणसिद्धीत येऊन आण्णा हजारेंची हत्या करेन'; कुणी दिली धमकी? काय आहे वाद?

आधीच अवकाळी पावसानं कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्याची अशी आडकाठी पाहून सदाभाऊ खोतांचा संताप अनावर झाला. त्यांनी ज्या अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला दंड ठोठावला. त्याच्याविरोधात आंदोलन सुरु केलं. तसेच संबंधित शेतकऱ्याची हळदीची पोती तिथेच रिकामी केली. चला बोली लावलीय तुमच्या दारात,तुमचं देणं लागतोय.भीक लागलीय तु्म्हांला पगार नाहीत. उपाशी पोटावर धंदे करतायत..सौदा करायचाय माझ्या बापाचा.. चला या इकडे, बोली लागलीय असं म्हणतअधिकार्यांची चांगलीच झाडाझडती घेत आंदोलन सुरु केलं.

काय घडलं ?

राहुरी येथील शिवाजीराव वने या शेतकऱ्याची हळद घेऊन जाणारी गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी सावळी येथे बुधवारी (दि.१२) अडवली.यावेळी हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीचा इन्शुरन्स संपल्याचं समोर आलं. यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला ३० हजार रुपये दंड ठोठावला.

Sadabhau Khot News
Mla Sandip Kshirsagr News : आमदार क्षीरसागरांनी धक्काबुक्की केल्याचा वडिलांचा आरोप ; गुन्हा दाखल..

लाडवलेल्या जावयांना सरकार आवरणार की नाही?

सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि परिवहन खात्याच्या कारभारावर चांगलीच आगपाखड केला. राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ? जनतेची लूट करणाऱ्या सरकारच्या लाडवलेल्या जावयांना सरकार आवरणार की नाही ? असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांचा मुजोरपणा राज्य सरकारने थांबवावा असा इशारा खोत यांनी दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com