Akkalkot Bazar Samiti : कल्याणशेट्टींची ‘रसद’ सिद्रामप्पांच्या कामी आली अन्‌ सर्वपक्षीय आघाडीच्या नेत्यांना ‘ओव्हर कॉन्फडन्स' नडला!

Akkalkot APMC News: माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे ८५ वर्षाचे असूनसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
Mallikarjun Patil, Siddharam Mhetre,  Sachin Kalyanshetti, Siddramappa Patil
Mallikarjun Patil, Siddharam Mhetre, Sachin Kalyanshetti, Siddramappa PatilSarkarnama

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Bazar Samiti) माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी स्पष्ट बहुमत मिळवून विरोधी सर्वपक्षीय आघाडीला जोरदार दणका दिला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin kalyanshetti) यांच्या ‘रसद’मुळे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी विरोधी पक्षाची मजबूत ‘तटबंदी’ उद्‌ध्वस्त केली. सर्वपक्षीय आघाडीच्या नेतेमंडळींना ‘ओव्हर कॉन्फडन्स' नडला. (Akkalkot Bazar Samiti Election Results Analysis)

अक्कलकोट बाजार समितीची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. दोन्ही पक्षाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे ही निवडणूक जिल्हाभर गाजत होती. दोन्ही गटाने अत्यंत 'घासून ' ही निवडणूक होणार असल्याचे अप्रत्यक्ष मान्य केले होते. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे ८५ वर्षाचे असूनसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. तर विरोधात सर्वपक्षीय आघाडीने पॅनल उभे केलेले होते.

Mallikarjun Patil, Siddharam Mhetre,  Sachin Kalyanshetti, Siddramappa Patil
Purandar News : पुरंदरचे माजी आमदार सध्या बारामतीत काही वल्गना करत आहेत, त्यांनी आधी स्वतःचे पहावे : राष्ट्रवादीचा शिवतारेंना टोला

काँग्रेसचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, भाजपचे आनंद तानवडे, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, शिवसेना शिंदे गटाचे संजय देशमुख, जनसेवा संघटनेचे तुकाराम बिराजदार व साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे गोकुळ शुगरचे दत्ता शिंदे व कपिल शिंदे आदींनी सर्व विरोधी पक्षाची मोट बांधून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. त्यास माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा सक्रिय पाठिंबा होता.

सर्वपक्षीय आघाडीत एकापेक्षा एक दिग्गज नेतेमंडळी असतानासुद्धा 'ओव्हर कॉन्फडन्समुळे' पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणाहून रसद मिळत असतानासुद्धा सर्वपक्षीय आघाडीचे काही उमेदवार वैयक्तिक मते मागत होती. सोसायटी मतदारसंघात अकरापैकी दहा जागा माजी आमदार पाटील यांच्या गटाने जिंकून सहकारात 'मै नही तो कौन' असे म्हणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

Mallikarjun Patil, Siddharam Mhetre,  Sachin Kalyanshetti, Siddramappa Patil
Saroj Patil On Sharad Pawar Retirement: अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पवारांना त्यांच्या बहिणीने दिला हा सल्ला…

सर्वपक्षीय आघाडीच्या केवळ मल्लिकार्जुन पाटील यांनाच यश मिळाले. भाजपच्या सोसायटी मतदारसंघातील शेवटच्या विजयी उमेदवाराला ३४० मते मिळाली, तर भाजपचे नेते आनंद तानवडे यांच्या काकांना बसवराज तानवडे यांना ३३४ मते मिळाली. अवघ्या सहा मतांनी त्यांचा पराभव झाला, तर तडवळ भागातील सुरेश गड्डी, भावी सभापती अशी प्रसिद्धी मिळालेल्या आघाडीच्या कपिल शिंदे यांना ३३१ मते मिळून नऊ मतांनी त्यांचा पराभव झाला. या सर्व उमेदवारांना 'क्रॉस वोटिंगचा ' फटका बसला. (Political Breaking News)

सर्वपक्षीय आघाडीचे नेतृत्व करणारे दुसऱ्या फळीतील नेते माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना ३५७ मते सोसायटी मतदारसंघात मिळाली. ते सर्वाधिक मते मिळविणाऱ्या ‘टॉप थ्री' विजयी उमेदवारांमध्ये मोडतात. पण त्यांना मिळालेले अधिकची मते इतर उमेदवारांना मिळू शकली नसल्याने सर्व पक्षीय आघाडीचे तीन चार उमेदवार विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. व्यापारी मतदारसंघात सर्वपक्षीय आघाडीने उमेदवार न दिल्यामुळे त्याचा फटका बसून भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले.

Mallikarjun Patil, Siddharam Mhetre,  Sachin Kalyanshetti, Siddramappa Patil
Sharad Pawar Retirement News : पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर धाराशिव, बुलडाण्याच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

अपक्ष उमेदवार विजयकुमार कापसे यांच्या पाठीशी बहुसंख्य व्यापारी असतानासुद्धा बसवराज माशाळे व श्रीशैल घेवारे यांनी चमत्कार केला व विजय खेचून आणला. सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघात माजी नगराध्यक्ष सुवर्णा मलगोंडा या ५ उमेदवारांत चार नंबरवर गेल्या. या मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार शकुंतला खरात या अवघ्या तीन मतांनी पराभूत झाल्या. ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण चार जागेवर सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने सोसायटीवर वर्चस्व भाजपाचे तर ग्रामपंचायतीवर वर्चस्व काँग्रेसचे असल्याचे सिद्ध झाले.

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील गटाचे अनेक उमेदवार ३ ते १५ मताच्या अंतराने विजयी झाल्याने त्यांचा निसटता विजय झाला म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सक्रिय पाठबळ माजी आमदार पाटील यांच्या पाठीशी उभा केल्यामुळे हा विजय साकार झाल्याचे बोलले जाते. आमदार कल्याणशेट्टी जर तटस्थ राहिले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते. सहकारातील बलाढ्य नेते सिद्रामप्पा पाटील यांच्या विजयात आमदार कल्याणशेट्टी यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच माजी आमदार पाटील यांनी माझी ही शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक आवाहन मतदारांना केल्याचा फायदा त्यांना झाला.

Mallikarjun Patil, Siddharam Mhetre,  Sachin Kalyanshetti, Siddramappa Patil
Sharad Pawar Announces Resignation: प्रफुल्ल पटेल हात जोडून विनंती करत होते; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मागे हटायला तयार नव्हते!

गोकुळच्या साखरेचा आस्वाद घेऊनही काहींनी 'क्रॉस वोटिंग ' करून पुन्हा शिंदेंच्या पदरी पराभवाचे स्वीट गिफ्ट दिले. अक्कलकोट बाजार समितीच्या १८ संचालकांमध्ये मराठा समाजातील एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. अक्कलकोट मार्केट कमिटीच्या विजयाचा परिणाम आगामी अक्कलकोट नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर होण्याची शक्यता आहे.(Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com