Maan News : पंतप्रधान होण्याचे ध्येय; रासपचे दिल्लीत कार्यालय उभारणार : महादेव जानकर

Mahadev Jankar राष्ट्रीय समाज पक्षाने आपली ताकद निर्माण केली आहे. त्यामुळेच आपल्या पक्षाला कॅबिनेट मंत्री पद मिळाले, असे श्री. जानकर म्हणाले.
RSP Leader Mahadev Jankar
RSP Leader Mahadev Jankarsarkarnama

-विशाल गुंजवटे

Maan News : राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी ताकद निर्माण झाली असून दिल्लीत आपल्या पक्षाचे कार्यालय व सर्व समाजबांधव, शेतकरी,विद्यार्थ्यांच्या निवासासाठी भवन उभारण्याचा आम्ही निर्धार केला आहे. यासाठी जागा व इमारत असे चार कोटी रूपये लागणार असून यासाठी आम्ही मदत जमा करण्यासाठी फिरत आहोत. या कार्यास राज्यभरातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक,आमदार महादेव जानकर यांनी दिली.

जाधववाडी (ता.माण) येथे रासपचे Rashtriya Samaj Paksha जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर यांनी आपल्या विरकर कुटुंबियांच्या वतीने आमदार जानकर Mahadev Jankar यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या कार्यालय व भवनासाठी 55 हजारांची रोख मदत दिली.

यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव माऊली सरगर, राज्य कार्यकारणी सदस्य, माण बाजार समितीचे उपसभापती वैशाली विरकर, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, श्रीकांत देवकर, महिला आघाडी अध्यक्षा पूजाताई घाडगे उपस्थित होते.

RSP Leader Mahadev Jankar
Maan News : आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, धनगर समाजाला सरकारने झुलवत ठेवले : नाना पटोले

महादेव जानकर म्हणाले, मी पंतप्रधान होणार हे ध्येय उराशी बाळगून उत्तरप्रदेश, पंजाब याठिकाणी जावून राजकीय धडे घेत आपल्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर संघटना वाढीसाठी राज्यभर फिरलो. आज राष्ट्रीय समाज पक्षाने आपली ताकद निर्माण केली आहे.

RSP Leader Mahadev Jankar
Jaykumar Gore News : जिहे-कटापूरचे पाणी पंधरा दिवसात माणमध्ये; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन....

त्यामुळेच आपल्या पक्षाला कॅबिनेट मंत्री पद मिळाले. जे आपल्याला वेड्यात काढत होते, ते आज आपल्या पक्षातून विविध निवडणूकांत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेत रासपने मोठी ताकद निर्माण केलीय.

RSP Leader Mahadev Jankar
Satara News : राज्यपालांचा महाबळेश्‍वर दौरा पुढे ढकलला

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित, महापालिका,लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही आपली ताकद दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी जातपात न बघता फक्त रासप पक्ष बघून मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

RSP Leader Mahadev Jankar
Satara Bribe News : पंधराशे रूपयांची लाच घेताना दुय्यम निबंधकास पकडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in