Dhananjay Munde Critcized Pankaja Munde: जवाहर संस्थेवर पंकजा मुंडेंचा विजय अन् धनंजय मुंडे सूचक विधान; तर अनेकांचा..

Beed Politics | जवाहर एज्युकेशन संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली
Dhananjay Munde Critcized Pankaja Munde:
Dhananjay Munde Critcized Pankaja Munde: Sarkarnama

Dhananjay Munde vs Pankaja Munde News | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या जवाहर एज्युकेशन संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्यापाठोपाठ आता पंकजा मुंडे यादेखील जवाहर संस्थेत बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचं या सोसायटीवरील वर्चस्व दिसून आलं.त्यांच्या या विजयावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रीयेची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर आजतागायत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे या संस्थेवर वर्चस्व राहिले आहे. संचालक मंडळाच्या 34 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीत हितचिंतक सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्याविरोधात बालाजी गित्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. पण शेवटच्या दिवशी गित्ते यांनी अर्ज मागे घेतल्याने पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. त्याच्या या बिनविरोध निवडीनंतर धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रीयेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Marathwada Politics)

Dhananjay Munde Critcized Pankaja Munde:
Nana Patole On Ajit Pawar : 'नाईलाज' शब्द वापरण्यापेक्षा शपथच घ्यायची नव्हती; पटोलेंनी अजित पवारांना सुनावलं !

पंकजा मुंडे बिनविरोध निवडून आल्या नसत्या तर अनेकांचा कार्यक्रमच झाला असता, असं सूचक विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे. दरम्यान सोसायटीच्या निवडणूक प्रचारावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर जोरदार हल्लाही चढवला होता. त्यांच्या पॅनलची काय अवस्था आहे? कशासाठी ते निवडणूक लढले…? त्यांची काय अवस्था आहे? समोरचा पॅनल उभा आहे पण तो उभा आहे, तर फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी. दुसरी काहीच अडचण नाही. कदाचित एखादा उमेदवार बिनविरोध निघाला नसता तर बऱ्याचजणांचा कार्यक्रमच उरकला असता. अनेकजणांनी फॉर्मच मागे घेतले असते. त्यामुळे विजय आपला निश्चित आहे.असंही धनंजय मुंडे म्हणाले होते. (Pankaja Munde-Dhananjay Munde)

यावेळी ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पायऱ्यावर नारळ फोडून धनंजय मुंडेंनी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी या निवडणुकीतील उमेदवार,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी, बीडमधील अनेक गावांचे सरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परळी बाजार समिती निवडणुकीतही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दोन पॅनलची लढत होणार आहे. त्यामुळे दोघांचीही मुंडे बहीण भावासाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनलेली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com