Pankaja Munde News : खरंच कडवटपणा कमी, `जवाहर` वर धनंजय यांच्यानंतर पंकजांची बिनविरोध निवड..

Marathwada : उर्वरित ३२ सभासदांसाठीची प्रक्रिया सुरू असून ६ मे रोजी मतदान होणार आहे.
Pankaja Munde , Dhananjay Munde News
Pankaja Munde , Dhananjay Munde News Sarkarnama

Beed Political : भगवान गडावर एकमेकांबद्दलचा कडवटपणा नाहीसा करण्याचा संकल्प पंकजा व धनंजय मुंडे या बहिण-भावाने केला होता. त्याची प्रचिती यायला लागली असून जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांची बिनविरोध निवड करत बहिणीने एक पाऊल पुढे टाकले होते. त्याला भावाकडून देखील प्रतिसाद मिळत असून आज पंकजा मुंडे यांची देखील याच संस्थेवर बिनविरोध निवड झाली.

Pankaja Munde , Dhananjay Munde News
Nanded Market Committee News : नांदेडात जागा वाटप ठरलं, महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब..

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विरोधात उमेदवार असलेल्या बालाजी गिते यांनी माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. (Beed) बीड जिल्ह्यातील परळी येथील जवाहर शिक्षण संस्थेची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरू आहे. ३४ संचालक मंडळ निवडीसाठी होत असलेल्या या निवडणुकीत (parli) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची आज बिनविरोध निवड झाली.

याआधी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची शिक्षण संस्थेवर बिनविरोध सभासद म्हणून निवड झाली आहे. दोघांच्याही विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता दोघे बहिण-भाऊ या संस्थेवर निवडून गेले आहेत. उर्वरित ३२ सभासदांसाठीची प्रक्रिया सुरू असून ६ मे रोजी मतदान होणार आहे. मुंडे बहिण-भाऊ बिनविरोध निवडून आले असले तरी या दोघांच्या पॅनलमध्ये मात्र चुरसीची लढाई होणार आहे.

पंकजा मुंडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली असून या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले बालाजी गिते यांनी माघार घेतली. त्यामुळे पंकजा यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. जवाहर शिक्षण संस्थेवर सुरूवातीपासून मुंडे यांचे वर्चस्व राहिले आहे.

आधी गोपीनाथ मुंडे आणि आता त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या संस्थेचा कारभार पाहत आहेत. पंकजा मुंडे यांची हितचिंतक सभासद गटातून अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गिते यांनी माघार घेतली. आता उर्वरित ३२ जागांसाठी दोन पॅनलमध्ये लढत होणार असून धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे अजय मुंडे, माजी राज्यमंत्री दौड यांच्यासह अनेक दिग्गजांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com