Radhakrishna Vikhe : शिंदे गटाचा 'हा' नेता म्हणतो,राधाकृष्ण विखे माझ्या ह्दयात आणि त्यांनी मुख्यमंत्रीही व्हावं...

Maharashtra Politics: सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज...
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु असल्याचा खासदार संजय राऊतांनी दावा केला होता.यानंतर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीच्या अजित पवारांचे ही राज्यात मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आता राधाकृष्ण विखे पाटलांसह राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचंही नाव पुढे आलं आहे. याचदरम्यान, आता शिंदे गटाच्या नेत्यानंही विखे पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलं आहे.

शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी हे छत्रपती संभाजीनगरमधील शिवना येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राधाकृष्ण विखे पाटील आणि रावसाहेब दानवे यांची देखील उपस्थिती होती. एकीकडे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात असताना सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुख्यमंत्रीपदावर मोठं विधान केलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Amol Kolhe BJP प्रवेशावर Chandrakant Patil म्हणाले.... | Politics | Maharashtra | Sarkarnama

सत्तार म्हणाले,''हनुमानासारखी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishana Vikhe Patil)च दिसतील. विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असे मला वाटते. पण त्यांना अडचण होईल असे मी बोलणार नाही. मला तसे प्रश्नही विचारू नका अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज...

जेव्हा पिता कतृत्त्ववान असतो, जेव्हा पिता इतका मोठा कतृत्व संपन्न असतो, महाराष्ट्र राज्याचं सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद ज्या माणसानं भूषवलंय आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो, अशा कतृत्व संपन्न पित्याचं कतृत्व समोर असताना पित्याच्या कर्तृत्वाचा माज नाही, तर पित्याच्या कष्टाचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाण असलेलं युवानेतृत्त्व म्हणून प्रतिक पाटील यांच्याकडे आज पाहावंस वाटतं."

Radhakrishna Vikhe Patil
Raut - Malik Meet: ''कोश्यारींना गांभीर्यानं घेता,त्यांचे बेकायदेशीर निर्णय..?''; मलिकांच्या भेटीनंतर राऊतांचं मोठं विधान

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com