Congress : भारत जोडो यात्रेतून दुख:द बातमी, काँग्रेस नेत्याचा ह्रदयाच्या झटक्याने मृत्यू!

Bharat Jodo Yatra : मृत्यू झालेले हे महाराष्ट्र नागपुरचे होते.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

नांदेड : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहचली आहे. मात्र यात्रा नांदेडमध्ये प्रवेश करता, एक दुख:द बातमी आली आहे. नांदेडमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करत असताना एका काँग्रेस नेत्याचा ह्रदयाच्या झटका येऊन मृत्यू झाला. या अकस्मात घटनेमुळे दुखं व्यक्त करण्यात येत आहे. कृष्ण कुमार पांडे असं मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे.

कृष्ण कुमार हे काँग्रेस सेवादल राष्ट्रीय सरचिटणीसपदी कार्यरत होते. भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये प्रवेश केल्यानंतर पांडे यांनी यात्रेतील झेंडा विभागाचे संचालन केले. या दरम्यानच, पांडे यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra : तळपती मशाल हातात घेत राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल

कृष्ण कुमार पांडे हे महाराष्ट्र नागपुरचे होते. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे दु:ख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनीही यावेळी दु:ख व्यक्त करून त्यांच्या कुटुंबियांप्रती सांत्वना व्यक्त केली.

Bharat Jodo Yatra
कोणतीही शक्ती भारत जोडो यात्रा रोखू शकत नाही : राहुल गांधींचा एल्गार

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रने नांदेडमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते व हजारो कार्यकर्ते्यांनी भारत जोडो यात्रेत सामील झाले. यावेळी यात्रेत अनेकांच्या हातात मशाली होत्या. मशाल हातात घेऊन हजारो काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी यात सहभाग नोंदवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com